पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे आदेश; लग्नं, कार्यक्रमांवर पुन्हा मर्यादा!

corona Virus new regulations issued pmc cultural political religious programme
corona Virus new regulations issued pmc cultural political religious programme

पुणे : पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाने कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या शहरात पुर्ण लॉकडाऊन करण्याची गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात मायक्रो कंटनमेंट झोन तयार केले असून तपासणी आणि चाचणीची संख्या वाढविली आहे. पुण्यात 84 कोरोना प्रतिंबधक लसीकरण केंद्र आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3,574 नवीन रुग्ण आढळले आहेत. 443822 एकुण सक्रिय रुग्णांची संख्या आहेत. तर 9440 एकुण मृतांची संख्या आहेत.


पुण्यात संपूर्ण लॉकडाउन? महापौरांनी केला खुलासा

पुणे महानगरपालिका हद्दीत महत्त्वाचे नवे आदेश !

  •  पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्ण प्रतिबंध राहील.
  •  लग्नसमारंभ कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.
  •  अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.
  •  पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय निवडावा.

गेल्या 24 तासात पुणे महानगरपालिका हद्दीत १२ हजार २३२ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असून लसीकरणाची एकूण संख्या १ लाख ८५ हजार ३४४ इतकी झाली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com