पुणेकरांनो आता आयसरमध्येही होणार कोरोना चाचणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) येथे कोरोना विषाणू चाचणी केंद्र कार्यान्वित झाले आहे.

पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) येथे कोरोना विषाणू चाचणी केंद्र कार्यान्वित झाले आहे. या केंद्राची उभारणी लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) आणि राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एनआयव्ही) मार्गदर्शनाखाली झाली आहे. आयसरने या चाचणी केंद्रासाठी एका कार्यसमितीची नेमणूकही केली आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने आयसरला कोविडच्या निदानासाठी परवानगी देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयसरचे संचालक प्रा. जयंत उदगावकर म्हणाले, "पुण्यात अधिकाधिक कोविड -19 ची चाचणी घेण्याची गरज आहे. ही गरज विचारात घेऊन संस्थेतील काही वैज्ञानिकांनी एकत्रितपणे संस्थेच्या आवारात अत्यल्प वेळेत ही सुविधा विकसित केली आहे. केंद्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांना योग्य प्रशिक्षण दिलेले आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कृति समितीचे नोडल अधिकारी प्रा. अंजन बॅनर्जी म्हणाले, "चाचणी केंद्रात आयसरमधील शास्त्रज्ञ, विद्यार्थी, टेक्‍निकल स्टाफ व इतर स्वयंसेवकांचा सहभाग आहे. चाचण्यांच्या तपशीलाचे जतन करण्यासाठी शास्त्रज्ञ एक संगणक प्रणाली विकसित करण्याचं काम करत आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus tested in Indian Institute of Science Education and Research