आता पुणे विद्यापीठात होणार कोरोनाचे निदान! 'एवढ्या' चाचण्या होणार शक्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

- पुढच्या दीड महिन्यात प्रयोगशाळा कार्यान्वीत
- ३५० चाचण्या होणार

पुणे : शहरात शासकीय तसेच खासगी प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी केली जात असताना आता पुढच्या महिन्यापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही निदान होणार आहे. यासाठी "सेंटर फॉर मॉल्यूकुलर डायग्रोस्टिक ऍड रिसर्च सेंटर' हे संशोधन केंद्र उभारणीचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोनाला थोपविण्यासाठी सोशल डिस्टन्ससह कोरोनाच्या चाचणी वाढवून तपासणी करणे हा उपाय आहे. मात्र, चाचण्या करण्यासाठी त्या दर्जाच्या लॅब उपलब्ध नसल्याने चाचण्या वाढविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे विद्यापीठाने कोरोनाच्या काळात प्रशासकीय पातळीवर मोठे काम केले आहे. तसेच विद्यापीठात सध्या बायोसेफ्टी लेव्हल दोनच्या प्रयोगशाळा आहेत, तेथे कोरोनाची चाचणी करणे शक्य नाही. त्यासाठी बायोसेफ्टी लेव्हल तीनची प्रयोगशाळा आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठाने प्रक्रिया पूर्ण केली आहे. 

बाप रे ! महिन्याभरात डिझेल 'एवढे' महागले; कार चालकांचे बजेटही कोलमडले

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, "कोरोनाच्या काळात पुणे विद्यापीठातील १५ प्राध्यापकांची टीम "आयसर'मध्ये तेथील शास्त्रज्ज्ञांसोबत संशोधनात काम करत आहे. पुणे शहरात चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याने पुणे विद्यापीठातही कोरोनासह इतर सर्वच साथीच्या रोगांचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे. त्यास मान्यता मिळाली असून, पुढच्या दीड महिन्यात एका दिवसाला ३५० कोरोनाच्या चाचण्या करणे शक्‍य होणार आहे.

पुणे विद्यापीठात मायक्रो बायोलॉजी, बायोटेक्‍नॉलॉजी क्षेत्रात काम केले जाते, पण येथे व्हायरॉलॉजी या शाखेवर काम केले जात नाही. त्यासाठी खास प्रयोगशाळेची गरज आहे. ही प्रयोगसाळा सुरू झाल्यानंतर त्याच्याशी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्‍नॉलॉजी यासह इतर विभाग त्याच्याशी जोडले जातील. तो पर्यंत "आयसर'मध्ये संशोधन करणारे प्राध्यापकांचे प्रशिक्षणही पूर्ण होईल, असे करमळकर यांनी सांगितले.

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

"कोरोनाच्या काळात पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरासह पुणे शहराच्या स्तरावर मोठ्याप्रमाणात काम केले आहे. पुण्यातील कोरोनाचे रुग्ण कोठे कमी होत आहेत, कोणत्या भागात कंटेन्मेंट झोन हवा आहे यासह इतर उपाय योजना काय कराव्यात याची माहिती वेळोवेळी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिली आहे.''
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू. 

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona will be diagnosed at Pune University