Corona Virus : कोरोनाच्या धुमाकुळमुळे सामान्य रुग्ण वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यखाते आणि प्रशासन खबरदारीच्या उपाय योजनांमध्ये व्यस्त आहे.अशा परिस्थितीत इतर सामान्य रुग्णांना औषधोपचार मिळणे कठीण बनले आहे.काही खाजगी रुग्णालये चालू असली तरी कोरोनाच्या भितीने बहुतांश खाजगी डाॅक्टरांनी ओपीडी क्लिनीक बंद करुन गाव गाठल्यामुळे सामान्य रुग्णांचे हाल चालू आहेत.
 

तळेगाव स्टेशन(पुणे) : कोरोनाच्या धामधुमीत खाजगी, सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रात सामान्य रुग्णांना उपचार नाकारण्याचे प्रकार वाढल्यामुळे सामान्य रुग्णांना वार्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यखाते आणि प्रशासन खबरदारीच्या उपाय योजनांमध्ये व्यस्त आहे.अशा परिस्थितीत इतर सामान्य रुग्णांना औषधोपचार मिळणे कठीण बनले आहे.काही खाजगी रुग्णालये चालू असली तरी कोरोनाच्या भितीने बहुतांश खाजगी डाॅक्टरांनी ओपीडी क्लिनीक बंद करुन गाव गाठल्यामुळे सामान्य रुग्णांचे हाल चालू आहेत.

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास
बुधवारी (ता.२५) सायंकाळनंतर चाकणहून प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेला जनरल हाॅस्पीटलमधून तीन वेळा परत पाठवण्यात आले. रात्री उशीरा नातेवाईकांसह चौकात उभ्या गरोदर महिलेला पाहिल्यानंतर उदयोजक किशोर आवारे आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण ओसवाल, जितेंद्र जैन यांनी मायमरच्या संचालिका डाॅ. सुचित्रा नागरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय

ग्रामीण भागातून पोलिसांचा ससेमिरा चुकवत कसेबसे रुग्णालयात पोहोचल्यानंतर उपचार मिळत नसल्यामुळे सामान्य रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोरोनाच्या धामधुमीत इतर आजारांमुळे बाधीत रुग्णांना उपचार न मिळाल्याने जीवावर बेतू शकते. खाजगी डाॅक्टरांना क्लिनीक सेवा चालू ठेवण्याची प्रशासनाने सक्ती करावी. तसेच तळेगाव प्राथमीक आरोग्य केंद्रात आणि जनरल हाॅस्पीटलमधील बाह्यरुग्ण विभाग २४ तास कार्यान्वीत ठेवण्याची मागणी आहे.

इंडियन मेडीकल असोसिएशन तळेगावचे अध्यक्ष डाॅ. दत्तात्रेय गोपाळघरे म्हणाले कि संघटनेच्या सदस्ययादीतील डाॅक्टरांची बहुतांश रुग्णालये चालू असून सामान्य रुग्णांना सेवा देत आहेत. तळेगावातील बहुतांश दवाखाने, प्रस्तुतिगृह आपत्कालीन स्थितीत रुग्णांना सेवा देत नाहीत.अशा डॉक्टरांना सामाजिक भान दिसत नाही. अशांचे वैद्यकीय परवाने नगरपरिषदेने निलंबित करावेत असे सामाजिक कार्यकर्ते जमीर नालबंद म्हणाले. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांचा आदेश लवकरच निघेल असे मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The coronary virus causes ignorance to the common patient