खराडी, विमाननगर, कल्याणीनगर परिसर बनतोय कोरोनाचा हाॅटस्पाॅट

corona logo1.jpg
corona logo1.jpg

रामवाडी (पुणे) : खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी, लोहगाव या ठिकाणी कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या ही नागरिकांसाठी चिंता वाढवणारी आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही प्रशासनाची डोकेदुखी ठरत असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नगररोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या चार ही प्रभागातील कोरोना रुग्णांची संख्या 656 वर जाऊन पोहचली आहे. यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे तर 357 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 280 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

मार्च महिन्यात कल्याणीनगर येथे प्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. प्रभाग- तीनमध्ये (विमाननगर सोमनाथनगर ) एकूण 211 रुग्ण आढळले होते. या पैकी 140 जणांना डिस्चार्ज दिला आहे आणि 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 62 रुग्णांवर उपचार सुरु आहे. प्रभाग चारमध्ये खराडी चंदननगर मध्ये एकूण 192 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 116 रुग्णांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या 70 रुग्णांवर उपचार सुरु आहे. प्रभाग पाचमध्ये एकूण 178 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 78 जणांना डिस्चार्ज दिला आहे व 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 96 रुग्णांवर उपचार सुरु आहे. प्रभाग 42 पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत  नव्याने समाविष्ट झालेल्या लोहगाव व परिसरात एकूण 75 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 23 जणांना डिस्चार्ज दिला आहे तर 52 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वाधिक कोरोना रुग्ण हे  जयप्रकाशनगर, गांधीनगर परिसरात आहे. त्या खालोखाल सोमनाथमळा, थिटेवस्ती, खराडकर पार्क, खंडोबामळा, कोपर आळी, खांदवे नगर, संतनगर, पठारेवस्ती, कल्याणीनगर व वडगावशेरी येथील सोसायटी व परिसर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रभाग 42 मध्ये इतर प्रभागाच्या तुलनेने रुग्ण संख्या कमी आहे तसेच मृत्यू हा शून्य आहे. परिसरात  कोरोना रुग्ण संख्या वाढत असून काही नागरिक विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे,  स्वतःची तसेच सार्वजनिक स्वच्छता न राखणे, कोरोनाच्या काळात ही एकत्र येऊन वाढदिवस साजरा करणे असे प्रकार घडत आहे. असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन  प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com