हलगर्जीपणाचा कळस...पुण्यातील रुग्णालयातून कोरोनाबाधित महिलेला डिस्चार्ज 

राजेंद्र सांडभोर
शुक्रवार, 22 मे 2020

खेड तालुक्‍यातील राजगुरुनगरजवळच्या राक्षेवाडी येथील कोरोनाबाधित महिलेच्या 'डिस्चार्ज'बाबत पुणे येथील जहॉंगीर रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाला आहे.

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्‍यातील राजगुरुनगरजवळच्या राक्षेवाडी येथील कोरोनाबाधित महिलेच्या 'डिस्चार्ज'बाबत पुणे येथील जहॉंगीर रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाला आहे. या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यावर अवघ्या सहाच दिवसांत घरी सोडले. खेडचे सभापती अंकुश राक्षे यांनी तक्रार करून पाठपुरावा केल्यानंतर तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. 

खडकवासला प्रकल्पात पाणी उरलय किती...

राक्षेवाडीतील कोरोनाबाधित महिलेला तिच्या पतीकडून कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर तिला मे रोजी जहॉंगीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर महिलेला बरे वाटू लागल्याने अवघ्या सहाच दिवसांत म्हणजे मे रोजी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर खासगी वाहनाने महिला रात्री नऊ वाजता घरी पोहचली. कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला तरी तो कोरोनामुक्त झाल्याचा अहवाल येईपर्यंत, किमान दिवस रुग्णालयाच्या निगराणीखाली असावा, असा नियम आहे. तरीही या महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती सभापती राक्षे यांना मिळाली. 

मुंबईत कोरोना वाढतोय म्हणून इंदापुरात आले कुटुंब, पण...  

रुग्णालयाच्या या हलगर्जीपणाबद्दल राक्षे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार केली. त्यावर प्रसाद यांनी रुग्णालयाशी संपर्क साधून खडसावले. सभापती राक्षे, आयुष प्रसाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी रात्रभर पाठपुरावा केल्यानंतर रुग्णालयाने पहाटे या महिलेला पुन्हा पुण्याला नेऊन रुग्णालयात दाखल केले. तसेच या महिलेला घरी सोडणाऱ्या वाहनचालकास भोसरीमध्ये क्वारंटाइन करण्यात आले. 

चौकशी समितीची स्थापना 
रुग्णालयाच्या या हलगर्जीपणाबद्दल कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीला खेडचे गटविकास अधिकारी अजय जोशी आणि डॉ. बी. बी. गाढवे यांनी प्राथमिक अहवाल सादर केला, अशी माहिती खेडचे सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronated woman discharged from Pune hospital