Coronavirus : संसर्ग झालेल्या ८ जणांची प्रकृती स्थिर; ४२ जणांचे रिपोर्ट...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

दोन दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

पिंपरी : दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमाl पिंपरी-चिंचवडमधील 23 नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्यातील तिघांसह संपर्कात आलेल्या पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे अशा एकूण आठ जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात सुरुवातीला १२ जण पाॅझिटीव्ह आढळले होते. उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेले तीन व त्यांच्या संपर्कात आलेले पाच अशा आठ जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर वायसीएम व भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- कुपवाडा : चकमकीत ५ जवान हुतात्मा तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा!

आयुक्त म्हणतात...

दरम्यान, शहरातून निजामुद्दीन येथे 33 जण गेल्याची प्राथमिक माहिती होती. त्यानुसार शोध घेतला असता 23 जणांचा शोध लागला. मात्र, दहा जण संबंधित पत्त्यावर सापडले नाहीत. सध्या ते शहरात राहात नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. तरीही द‌क्षता म्हणून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरूच आहे. त्याशिवाय आणखी कोणी निजामुद्दीन येथील कार्यक्रमास जाऊन आलेले असल्यास किंवा त्यांच्या संपर्कात आले असल्यास त्यांनी महापालिका रुग्णालयांत येऊन तपासणी करून घ्यावी व धोका टाळावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. 

- Coronavirus : २४ तासांत कोरोनाच्या ६९३ नव्या केसेस; तबलिगींच्या संपर्कात...

दृष्टिक्षेपात :
एकूण नमुने : ५२९
निगेटिव्ह : ४४५
प्रलंबित : ६४
पाॅझिटीव्ह : २०
घरी सोडले : १२
उपचार सुरू : ८
होम क्वारनटाइन : १७९५

डॉक्टर आणि कर्मचारी क्वाॅरनटाईन

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर केलेल्या तपासणीत तो रुग्ण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी हे संपर्कात होते, त्यांना रुग्णालयीन प्रशासनाने इतर कुणाच्याही संपर्कात न येता खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे.

- Lockdown : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; पेठा करणार सील!

रुग्णावर शस्त्रक्रिया करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दोन दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टर्स व रुग्णालयीन स्टाफला क्वारन्टाईन करण्यात आले असून त्यांच्या घशातील द्रवांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. आता त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus 8 infected persons by Covid 19 are stable in nature