धक्कादायक : बारामतीत भाजी विक्रेत्यास कोरोनाची लागण 

टीम ई-सकाळ
Monday, 6 April 2020

अनेक लोकांना याची बाधा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने आता संबंधित लोकांचा तपास सुरू केला आहे.

बारामती Coronavirus : शहरातील समर्थनगर परिसरात भाजीपाला विक्री करणा-या एका व्यावसायिकास कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आज सिध्द झाले आहे. या नंतर समर्थनगर हे केंद्र धरुन तीन किलोमीटरचा परिसर कटेंनमेंट झोन म्हणून तर पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन जाहीर केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 आणखी वाचा - फक्त चीनला दोष देण्यात काय अर्थ आहे?

दरम्यान, अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. अनेक लोकांना याची बाधा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने आता संबंधित लोकांचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर आता बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन कांबळे यांनी केले आहे. पोलिसांनी हा परिसर सील केलेला असून प्रत्येक वाहन तपासणीनंतरच सोडले जाणार हे. पोलिसांनी या ठिकाणी चौकी लावलेली असून या भागातील लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. रिक्षाचालक कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारत असताना व इतरांची टेस्ट निगेटीव्ह आली असताना आता भाजीविक्रेता कोरोनाबाधित निघाल्याने बारामतीकरांची झोप उडाली आहे. बारामती नगरपालिकेने आता या परिसराचे सर्वेक्षण तातडीने सुरु करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

आणखी वाचा - लॉक डाऊनच्या काळात पर्सनल फायनान्सकडे लक्ष द्या!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus baramati vegetable vendor got positive covid19