ऐकलंत का ? फुरसुंगी आणि भेकराईनगरच्या वेशीवर कोरोनाची थाप

Coronavirus entry in Fursungi and Bhekrai Nagar  in Pune
Coronavirus entry in Fursungi and Bhekrai Nagar in Pune

पुणे : पुण्यातल्या पेठांमधला कोरोना आपल्या गावच्या वेशीला शिवणार नसल्याच्या शक्‍यतेने बिनधास्त राहिलेल्या फुरसुंगी-भेकराईनगरात कोरोना आपले बस्तान बसविण्याच्या बेतात आहे. या भागांत रुग्ण सापडले आणि तो पसरण्याचा अंदाज येताच फुरसुंगी-भेकराईनगर चक्क बाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) जाहीर झाला आहे. परिणामी, कोरोना फुरसुंगीकरांच्या दारावरच थाप दिल्याने महिनाभर गाफील राहिलेल्या या मंडळीची खरोखरीच झोप उडाली आहे. दुसरीकडे, मुख्य प्रवेशद्वार असलेल्या हडपसरपासूनच कोरोनाचा धोका असल्याने फुरसुंगीकरांना खऱ्याअर्थाने सावध राहावे लागेल, हेही निश्‍चित आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

फुरसुंगी गावातील सर्व्हे क्रमांक (175, 176, 177, 178, 204, 206 आणि 207 या परिसरांसह भेकराईनगरच्या काही पट्ट्यात कोरोनाची लागण झाल्याचे उघड आहे. येथील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता, फुरसुंगी-भेकराईनगर 'कंटेन्मेंट झोन' जाहीर करताना या भागांत खबरदारीच्या कठोर उपाय करण्यात येत असून, येथील बाजारपेठांमधील गर्दीला रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. या परिसरांमधील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्याशिवाय कोरोनाचा फैलाव होण्याच्या अंदाज घेऊन निर्बंध लादले जात आहेत, असे महापालिका प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले. 
आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...

हद्दीलगतचे गाव फुरसुंगी, उरळी देवाची ही गावे अडीच वर्षांपूर्वी महापालिकेत आली आहेत. फुरसुंगीची लोकसंख्या साधारपणे सात ते साडेसात लाखांच्या घरात आहे. जेव्हा पुण्यात कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा ग्रामीण भाग म्हणून या भागांत फारसे रुग्ण सापडणार नसल्याचे गृहीत धरण्यात आले. तरीही, फुरसुंगीलगतच्या हडपसरमध्ये 50 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले. त्यावेळीही फुरसंगीला कोरोनाचा धोका झाला नाही. परंतु, गेल्या दहा दिवसां काही ठिकाणी रुग्ण सापडल्याने फुरसुंगीसह शेजारची उरळी देवाची, भेकराईनगर, मांजरी ही गावे हादरली आहेत. 

कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणार

फुरसुंगीलगतच्या हडपसरमध्ये सय्यदनगर, मगर पेट्रोल पंपाशेजारीचा परिसर, मारुती मंदीर परिसर, संत तेरेसा परिसर, गजानन कॉलनीमधील सर्व सहा गल्ल्या, आयसीआयसीआय बॅंक, हॉटेल संग्राम परिसर आदी परिसरही बाधित क्षेत्रात आहे. त्यामुळे फुरसुंगीच्या प्रवेशद्वारापासूनच कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागल्याने आता ग्रामस्थांना खरोखरीच सावध राहावे लागणार आहे. तेव्हा, या गावांत कपड्यांची विशेषत : साड्यांची मोठी बाजारपेठ आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच येथील दुकानांचे "लॉक' उघडले गेले आणि व्यवहार पूर्ववत झाले. त्यात सुरक्षिततेकडे काणाडोळा होण्याची चिन्हे असल्याने धोका पसरण्याची भीती आहे.

 आदित्य ठाकरे यांची पुण्याच्या आमदाराबरोबर ट्विटरवर जुंपली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com