
पिंपरी Coronavirus : थायलंडहून परतलेल्या कुटुंबाला घरातून बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय. पिंपरीतील एक कुटुंब, एका लग्नाच्या निमित्तानं थायलंडमध्ये गेले होते. तेथून हे कुटुंब पिंपरीत घरी परतले आहे. चीन, आणि दक्षिण पूर्व आशियात असलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळं या कुटुंबाला काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गरज पडल्यास आयसोलेशन कक्षात
याबाबत मिळालेली माहिती अशी, लग्न सोहळ्यासाठी शहरातील काही जण थायलंडमध्ये गेले होते. ते परत आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची यादी संबंधित कुटुंब प्रमुखांकडे मागितली आहे. त्यांचे प्रवासाचे टप्पे तपासून कार्यवाही केली जाईल. मात्र, थायलंडहून परतलेल्या व्यक्तींनी घरातच थांबावे. होम बेस्ड कॉरंटाईन, करावे अर्थात घरातील अन्य सदस्यांपासून विभक्त राहावे, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत. गरज पडल्यास त्यांना आयसोलेशन कक्षात दाखल केले जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच, अन्य देशात गेलेले शहरातील नागरिकही परत येत आहेत. त्यांचीही माहिती घेतली जात असून, तपासणी केली जात असल्याचेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यातील एक दाम्पत्य दुबईत सहलीला गेले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची मुलगी आणि मुंबईतून त्यांना पुण्यात सोडण्यासाठी आलेल्या कॅब ड्रायव्हला कोरोनाची लागण झाल्यानंतर, त्यांच्या सहलीच्या ग्रुपमधीलच एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर फ्रान्समधून भारतात आलेल्या एका नागरिकालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. ही व्यक्ती ठाण्यातील असून, त्याच्यावर उपचारही सुरू करण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 12 झाली असून, या सर्वांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले, "राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळांवर गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करून आले आहे, त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. टुर ऑपरेटर्सनी परदेशवारी केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.