मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर आता दोन दिवसांनी पुण्यात काय होणार?

coronavirus lockdown restrictions red zone uddhav thackeray statement
coronavirus lockdown restrictions red zone uddhav thackeray statement

पुणे Coronavirus : राज्यातील लॉडाउनमधून रेड झोनला सवलती देणे शक्य नाही होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यामुळे पुण्यात दोन दिवसांनंतर काय होणार, या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

ऑरेंज झोनमध्येही फारशी शिथिलता होणार नाही. त्यामुळे ग्रीन झोनमध्येच काही प्रमाणात शिथिलता होऊ शकेल. मात्र, वाहतूक बंद ठेवावीच लागणार आहे. मुंबई परिसर, पुणे परिसर, औरंगाबाद परिसर आदी ठिकाणी सध्या रेड झोन आहे. त्या बाजूच्या ऑेरेंज झोनबद्दलही काळजी आहेच. रेड झोनमध्ये तीन मे नंतरही नियम कडकपणे पाळावेच लागतील. ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये थोडी फार मोकळीक देता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी राज्याला संबोधित करताना स्पष्ट केले आहे.

कोणता प्रभाग ग्रीन? कोणता रेड?
पुण्यातील भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता, येरवडा, घोले रस्ता आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारित रेड झोन आहे. त्यात सुमारे 13 प्रभागांचा (प्रभाग क्र. 2, 6, 7, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 27, 29, 35) समावेश आहे.  ऑरेंज झोनमध्ये 13 प्रभागांचा (प्रभाग क्र. 3, 4, 5,15, 26, 28 33, 34, 36, 38, 41) समावेश आहे. तर, ग्रीन झोनमध्ये 15 प्रभागांचा (क्र. 1, 8, 9, 10, 11, 12, 13, 22, 23, 24, 30, 32, 37, 39, 40) समावेश आहे.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फक्त ग्रीन झोनमध्ये शिथीलता
मुख्यमंत्र्यांनीच सांगितल्यामुळे रेड झोनमध्ये 3 मे नंतर कोणत्याही सवलती देता येणार नाही. तर ऑरेंजमध्ये काही प्रमाणात सवलती देता येतील. ग्रीन झोनमध्येही काही प्रमाणात शिथिलता देता येईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. पुणे शहरातील वाहतूक तीन मे नंतर काही काळासाठी बंद ठेवावीच लागेल. रेड झोनमध्ये दुकाने उघडण्यासाठीचे निर्बंध कायम राहतील. तर ऑरेंज झोनमध्ये त्याची वेळ सुमारे दोन तासांनी वाढविण्यात येईल. ग्रीन झोनमध्येही दुकाने उघडण्याची वेळ काही तासांनी वाढविता येईल. औषध दुकानांचा त्यातून अपवाद असेल. अत्यावश्यक वस्तू आणि सेवाही त्यानुसार टप्प्याटप्याने शिथिल करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील एका अधिकाऱयाने सकाळशी बोलताना सांगितले.

तर, ग्रीन झोनमध्ये पुन्हा निर्बंध
ग्रीन झोनमध्ये शिथिलता दिल्यावर लोकांची विनाकारण गर्दी होत आहे, असे दिसल्यावर काही निर्बंध लागू होऊ शकतात. ऑरेंज झोनमध्ये दुकानांची वेळ वाढविता येईल. भाजीपाला, दुध वितरणावरील निर्बंध काही प्रमाणात कमी होतील. मात्र, हॉटेल, स्वीट मार्ट आणि अन्य प्रकारची दुकाने सुरू करण्यासाठी लॉक डाउनचा राज्य काय निर्णय घेईल, त्यावर अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर, तीन मे नंतरही काही काळ शहराच्या वेगवेगळ्या भागात निर्बंध कायम ठेवावे लागतील, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com