पुणे : रशियातून आल्यानंतर 8 डॉक्टरांनी काढला पळ; पिंपरीत रुग्ण वाढला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

जागरूक आणि सुशिक्षित घटक म्हणून वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर या घटकाकडे पाहिले जाते. परंतु, नुकत्याच मॉस्कोतून परतलेल्या डॉक्टॉरांनी महापालिकेकडे स्वत:हून माहिती देणे नुसते टाळलेच नाहीत, तर चक्क पळ काढला.

पिंपरी : जागरूक आणि सुशिक्षित घटक म्हणून वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर या घटकाकडे पाहिले जाते. परंतु, नुकत्याच मॉस्कोतून परतलेल्या डॉक्टॉरांनी महापालिकेकडे स्वत:हून माहिती देणे नुसते टाळलेच नाहीत, तर चक्क पळ काढला. मात्र, आरोग्य वैद्यकिय विभागास मिळाल्यावर त्यांनी कसून शोध घेतला आणि तपासणीअंती त्यांना 'होमक्वारंटाइन' केले. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. आज (ता.20) 24 वर्षिय तरूणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित रुग्ण हा फिलिपिन्स येथून प्रवास करून आलेला आहे. परिणामी शहरात बाधितांची संख्या 12 वर पोहचली आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 15 डॉक्टिर युरोपवारीला गेले होते. नुकतेच ही मंडळी मॉस्कोतून भारतात परतले आहेत. पुण्याच्या विमानतळावर त्यांनी नजर चुकवून पळ काढला होता. त्यापैकी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल आठ डॉक्टर आहेत. परंतु, या डॉक्टचर मंडळींनी सहकार्य करण्याऐवजी माहिती देण्याचे टाळले. या बहाद्दारांनी गुपित राखत पळ काढला. मात्र, आरोग्य वैद्यकिय विभागाचे प्रमुख डॉ. अनिल रॉय यांनी मिळाल्यावर संबंधितांशी वारंवार संपर्क साधला. या प्रवासी डॉक्टरांची यादी प्राप्त झाल्यामुळं त्यांचा कसून शोध घेतला. सापडल्यावर त्यांना वैद्यकिय तपासणी केली. आता त्यांना 14 दिवसांची विश्रांती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना "होमक्वारंटाइन' केले असून, त्यांच्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बारकाइने लक्ष दिले जात आहे.

वाईन शॉप, देशी दारूची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद

14 दिवस घरातच थांबा
चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान 14 दिवस घरांमध्येच "होम क्वॉरनटाईन' करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मार्केटयार्ड बंदला उर्त्स्फूत प्रतिसाद

16 जणांना "होमक्वारंटाइन' आज (ता.20) परदेशातून आलेल्या प्रवाशांना पुणे विमान तळावरूनच पुणे महापालिकेच्या पथकाने उचले आणि सणस मैदानावरील "होम क्वॉरनटाईन सेंटर'मध्ये ठेवले होते. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील 16 जणांचा समावेश होता. तपासणीनंतर त्यांना आपापल्या घरी सोडण्यात आले आहे. त्यांना आता पुढील 14 दिवसासाठी  "होमक्वारंटाइन' केले आहे.  

पिंपरी-चिंचवड : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या 31 मार्चपर्यंत बंद राहणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune pimpri eight doctors escape from airport now home quarantine