पुण्यातील कंटेन्मेट झोनमधील `एवढ्या` जणांना मिळाला आधार 

hand.jpg
hand.jpg
Updated on

कॅन्टोन्मेंट (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाउनचा पाचवा टप्पा सुरु आहे. यात कंटेन्मेट झोन वगळून शहरातील इतर भागातील नियम शिथिल करण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोनमधील पेठांच्या परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी ठरवून दिलेल्या वेळेतच लोकांना बाहेर पडावे लागते. अशावेळी वेळेचा अभाव त्यात आर्थिक चणचण सध्या निर्माण झाल्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटूंबियांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

लोकांची गरज हेच आपले आपले खरे कर्तव्य मानून नगरसेवक अजय खेडेकर हे लाॅकडाउनच्या सुरवातीपासूनच मतदारांच्या मदतीला उभे आहेत. आतापर्यंत त्यांच्या प्रभागात व प्रभागाबाहेरील 10 हजार गरजूंना अन्नधान्याचे किट वाटप केले. 7500 कुटूंबियांना सॅनिटायझर व 21 हजार मास्कचे  वाटप करण्यात आले. तसेच 9370 कुटुंबियांना उज्ज्वला गॅस योजनाच्या माध्यमातून आतापर्यंत मोफत गॅस वाटप करण्यात आले. तर 5300 जनधन खाते धारकांना शासकीय मदत ही मिळवून दिली आहे.

यावेळी घोरपडे पेठ पुर्ण, झगडेवाडी, पेंटर वाडा, मीरा मार्केट परिसर, पंचहौद मित्र मंडळ परिसर, जोशीसमाज वस्ती, लकी बेकरी गुरुवारपेठ, खडकमाळआळी, खेडेकर भाजी मार्केट, नवलोबानाथ मंदीर परिसर, साईबाबा गल्ली, जहागीरदार मारूती परिसर,पायगुडे गल्ली भागात या सेवा पुरविण्यात आल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, प्रभाग अध्यक्ष राजेन्द्र काकडे, जयसिंग रजपूत, योगेश वेदपाठक,  राजूशेठ खेडेकर, राजेंद्र भोसले, नंदू झेंडे, अण्णा ओतूरकर, जयदीप परदेशी, विठ्ठल शिरस, नंदू पवार,  राजू पाथरे, सोमा धायगुडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com