आम्हाला धुमधडाक्‍यात लग्न करायचं होतं पण... 

marrige1.jpg
marrige1.jpg
Updated on

हडपसर (पुणे) : करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लाकडाउनमुळे अनेक विवाहेच्छुकांचे विवाह लांबणीवर पडत असले, तरी वानवडी येथील एका जोडप्यांनी लॉकडाउनच्या काळातच साधेपणाने विवाह करून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. प्रसाद बोरकर व स्नेहल बांडेगुचे असे या वधू-वराचे नाव आहे. दोघेही पोलिस दलात सेवेत आहेत. 

ठरलेले लग्न...अचानक आलेले कोरोनाचे संकट..मुलगा राज्य राखीव पोलिस दलात लॉकडाऊनमधील बंदोबस्तावर तर मुलगी नागपूर शहर पोलिस विभागात कर्तव्यावर आहेत. आझादनगर येथे मुलाच्या घरी मास्क लावून व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा विवाह संपन्न झाला. 

लॉकडाऊनमुळे मुलीचे नातेवाईक लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. कसलाही गाजावाजा न करता संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यातील वधू-वरांना माजी महापौर प्रशांत जगताप यांनी या वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रकारचे नियम पाळून शुभविवाह पार पाडल्याबद्दल दोन्ही कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले. 

प्रसाद व स्नेहल म्हणाले, "सर्वांप्रमाणे आमची देखील धुमधडाक्‍यात लग्न करण्याची इच्छा होती, तशी तयारी देखील करण्यात आली होती, पण लग्नाला उपस्थित हजर असणाऱ्या माणसांमध्ये एखाद्याला कोरोना विषाणूची लागण झालेली असेल तर त्याची लागण इतरांना होऊ शकते हा धोका लक्षात घेऊन सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले व साध्या पध्दतीने लग्न केले.' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com