कोरोना संसर्गात सकारात्मक विचार आणि योग्य खबरदारीने सावरले दांपत्य

लग्नानंतर चार वर्षांनी दर्शना व राहुल यादव (नावे बदललेली आहेत) यांच्या घरी गोड बातमी आली होती. त्यातच दोघांनाही कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि बाळाची चाहूल लागल्याचा आनंद, असा दुहेरी अनुभव हे जोडपे घेत होते.
Pregnant Women
Pregnant WomenGoogle

पुणे - लग्नानंतर चार वर्षांनी दर्शना व राहुल यादव (नावे बदललेली आहेत) यांच्या घरी गोड बातमी आली होती. त्यातच दोघांनाही कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि बाळाची चाहूल लागल्याचा आनंद, असा दुहेरी अनुभव हे जोडपे घेत होते. आता बाळाला संसर्ग होणार नाही ना?, अशी चिंता त्यांना होती. त्यामुळे मानसिक त्रास वाढू लागला. मात्र सकारात्मक विचार ठेवून योग्य ती खबरदारी आणि उपचार घेऊन हे दांपत्य कोरोनातून पूर्णपणे बरे झाले.

सदाशिव पेठेतील ३२ वर्षीय राहुल हे आयटी कंपनीत नोकरीला असून, त्यांची पत्नी दर्शना गृहिणी आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, त्यात दर्शना गर्भवती असल्यामुळे हे दांपत्य सर्व खबरदारी घेत होते. मात्र, दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ते घाबरले. भीती, चिंता व मानसिक ताणामुळे दोघांच्या मनःस्थितीवर विपरीत परिणाम होऊ लागला. नेमका संसर्ग कसा झाला, याची कल्पना त्यांना आली नाही. त्यांना घरीच क्वारंटाईन केले. शारीरिक उपचारांसह दोघांचे समुपदेशनही केले. त्यामुळे दोघांनीही या कठीण परिस्थितीत एकमेकांचा आधार दिला अन्‌ ते कोरोनामुक्त झाले.

Pregnant Women
दुसऱ्यांना हसविणाऱ्या ‘जोकर’च्या डोळ्यात पाणी

या दांपत्याचे समुपदेशन करणाऱ्या ज्येष्ठ समुपदेशक स्मिता कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेक लोकांमध्ये अपराधीपणाची भावना दिसते. तर काही लोक मलाच का संसर्ग झाला, या भावनेने अस्वस्थ होतात. दोन्ही भावना स्वतःला दोषी ठरविण्यास पूरक असतात. या दांपत्यामध्येही अशाच प्रकारची मानसिकता निर्माण झाली होती. यावर त्वरित काम करणे गरजेचे असते, अन्यथा रुग्ण वैद्यकीय उपचारांना नकार अथवा अल्प प्रतिसाद देऊ लागतात व त्यांची प्रकृती अधिक गंभीर होते.’’

गर्भवतींनी अशी घ्यावी काळजी...

गर्भातील बाळाला शक्यतो संसर्ग होत नाही.

प्रसूतीदरम्यान जन्माला आलेल्या बाळाला संसर्गाची शक्यता असते.

प्रसूतीचा काळ जवळ आल्यावर त्वरित कोरोना चाचणी करावी.

वेळोवेळी तपासणी करत डॉक्टरांशी समन्वय साधणे गरजेचे.

संसर्ग झाल्यावरही पौष्टिक आहार आणि पुरेशी विश्रांती आवश्यक.

क्वारंटाईन झाल्यावरही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com