घटस्फोट घेणाऱ्या जोडप्याचं व्हॅलेंटाइनला जुळलं; त्यानं बायकोला पुन्हा केलं प्रपोज!

Couple
Couple
Updated on

पुणे : सततच्या मतभेदामुळे आमचे अजिबात पटत नव्हते. त्यामुळे आम्ही पती-पत्नीचे नाते संपविण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. मात्र समुपदेशनामुळे आणि न्यायप्रणालीच्या आधारामुळे आमच्यामधील वादाची दरी मिटली आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो, असा प्रवास एका जोडप्याने उलगडला.

निमित्त होते कौटुंबिक न्यायालयात आयोजित ‘जोडी तुझी माझी’ या कार्यक्रमाचे. एवढेच नाही त्यांनी या कार्यक्रमात सर्वांसमोर पत्नीला पुन्हा एकदा प्रपोज केले. समुपदेशनानंतर नांदण्यास गेलेल्या जोडप्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे, त्यांच्यातील वाद कायम मिटावे यासाठी कौटुंबिक न्यायालयात व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित जोडप्याने आपली कहाणी सर्वांना सांगितली. यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. आर. काफरे, न्यायाधीश एच. के. गणात्रा, न्यायाधीश भालचंद्र नाईकवडे, आराध्ये, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अ‍ॅड. वैशाली चांदणे, रोटरीचे स्नेहा सुभेदार उपस्थित होत्या.

जोडप्यांनी एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार करून नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे मत अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी व्यक्त केले. यावेळी वाद मिटवून एकत्र आलेल्या २० जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यातील नाते अधिक घट्ट व्हावे यासाठी विविध खेळ, रोल प्लेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ विवाह समुपदेशक स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. तर, विवाह समुपदेशक संगीता पांडे, राणी दाते, नूतन अभंग, सुवर्णा पाटील, मृदुल पात्रीकर यांनी रोल प्ले सादर केला.

वाद वेळीच सामंजस्याने मिटायला हवे :
येथील कौटुंबिक न्यायालयाची कार्यपद्धती इतर न्यायालयापेक्षा वेगळी आहे. कौटुंबिक दाव्यांमध्ये कुटुंब टिकावे आणि त्यांच्यात समेट घडवून यावा यासाठी समुपदेशनाद्वारे प्रयत्न केले जातात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून मोठे वाद वाढतात. त्यामुळे वाद वेळीच सामंजस्याने मिटायला हवे. मुलांच्या भविष्यासाठी अहंकार बाजूला ठेऊन नात्याचा विचार केला जावा, असे मत प्रमुख न्यायाधीश काफरे यांनी व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com