लॉकडाउनमध्ये पळून जाऊन लग्न केलं; कोर्टानं दिला दिलासा

court order to send a girl to her husband as she is adult
court order to send a girl to her husband as she is adult

पुणे : लॉकडाऊन काळात पळून जाऊन आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला न्यायालयाने दिलासा दिला आहे. संबंधित मुलीला पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने केली होती. त्यामुळे पोलिसांनी तिला निरीक्षण गृहात पाठवले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मुलगी सज्ञान असल्याने तिला पतीकडे जाऊ द्यावे, असा निकाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. क्षिरसागर यांनी दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मुलीला पळवून नेल्याची आईने दाख केली तक्रार
संबंधित 18 वर्षीय तरुणीने मे महिन्यात एका तरूणाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला. 31 मे 2020 रोजी त्यांनी तशी नोंदणी केली. मात्र,  मुलीच्या घरातून या विवाहाला विरोध झाला.  तिला बळजबरीने पळवून नेऊन विवाह केल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली. पोलिसांनी अपहरणाची तक्रार दाखल करून घेत मुला-मुलीला ताब्यात घेतले. मुलीला महिला निरीक्षण गृहात ठेवण्यात आले. दरम्यान, हे प्रकरण प्रथमर्ग न्यायालयासमोर सुनावणीस आले.

मुलाच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला की, ''मुलगी सज्ञान असून 18 वर्ष पूर्ण झालेली आहे. तिच्यासोबत कोणतीही बळजबरी करण्यात आली नाही. त्यामुळे पतीला त्याच्या पत्नीचा ताबा द्यावा. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्याय निवाडे सादर करण्यात आले. मुलीच्या आईच्या वतीने वकीलांनी युक्तीवाद केला की, ''मुलीचे यापूर्वीच लग्न झाले आहे. पण न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरला नाही. कारण तिचे वय तेव्हा अठरा वर्षापेक्षा कमी असल्याचे कागदपत्रावरून आढळून आले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायदंडाधिकारी क्षिरसागर यांनी आदेश दिले की, मुलीची महिला निरीक्षण गृहातून तत्काळ सुटका करावी व तिला तिच्या पतीच्या घरी नांदण्यास जाऊ द्यावे.''

तक्रारीत पहिल्या लग्नाचा उल्लेख नाही :
''मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत तिचा पहिला विवाह झाल्याचा उल्लेख नाही. तसेच भारतीय दंडविधान 21 प्रमाणे 18 वर्षे पुर्ण झालेली मुलगी ही स्वतंत्र असून तिच्या मर्जीने विवाह करण्यास पात्र ठरते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ''

काम मिळत नव्हते, जवळ पैसे नाही, म्हणून कुटुंबाने मारली विहिरीत उडी; पण...

माझ्या मर्जीने प्रेम विवाह केला : 
बळजबरीने विवाह केल्याची तक्रार असल्याने न्यायालयासमोर मुलीची साक्ष घेण्यात आली. तेव्हा तिने सांगितले की, मी माझ्या मर्जीने पळून जाऊन प्रेम विवाह केला आहे. माझ्या सोबत कोणतीही बळजबरी केलेली नाही. मला पतीच्या घरीच नांदण्यास जायचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com