न्यायालयीन कामकाज होणार दोन शिफ्टमध्ये; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

-न्यायालयीन कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू होणार
-सुनावणी मात्र तत्काळ प्रकरणांपुरती मर्यादित

पुणे : न्यायालयात दाखल होणारे आणि प्रलंबित असलेले तत्काळ स्वरूपाचे दावे लवकर निकाली लागावे म्हणून 21 सप्टेंबरपासून जिल्हा न्यायालयाचे कामकाज आता दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. उच्च न्यायालयाने याबाबत परिपत्रक काढले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगळवारपासून (ता. 15) सर्व न्यायाधीशांच्या उपस्थित येथील कामकाज सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आता टप्प्याटप्याने कामकाजास गती देण्यात येत असल्याचे या निर्णयांमुळे स्पष्ट होते. मात्र दोन शिफ्टमध्ये कामकाज होणार असले तरी महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांवरच सुनावणी होणार आहे. कोरोनापुर्वीसारखे नियमित कामकाज होणार नाही. एखाद्या शहरात दोन शिफ्टमध्ये काम करणे शक्‍य नसेल तर त्याची पूर्वकल्पना प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी उच्च न्यायालयाला द्यावी, असे परिपत्रकात नमूद आहे.

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे रागावून घरातून निघुन गेलेला मुलगा सापडला

न्यायिक कामकाजाची वेळ कार्यालयीन कामकाज कर्मचारी उपस्थिती
पहिली शिफ्ट (सकाळ) पहिली शिफ्ट (सकाळ) ग्रुप ए व बी दर्जा - 100 टक्के
10.30 ते 01.30 10.00 ते 01.45 ( प्रत्येक शिफ्टला 50 टक्के)

दुसरी शिफ्ट (दुपार) दुसरी शिफ्ट (दुपार) ग्रुप सी व डी दर्जा - 60 टक्के
02.30 ते 05.30 02.00 ते 05.45 (प्रत्येक शिफ्टला 30 टक्के)

पुढील दाव्यांवर होणार सुनावणी
फौजदारी खटले ः

- फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार कलम 125 ते 128 मधील अर्ज
- कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे
- सत्र किंवा विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील आरोपी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष तुरुंगात आहे
- प्रथमवर्ग न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील आरोपी सहा किंवा त्यापेक्षा जास्त महिने तुरुंगात आहे
- खटल्याच्या निकालासाठी विशिष्ट कालावधी दिलेला आहे. (उदा. पोक्‍सो)
ृ- एनआयए किंवा सीबीआय तपास करीत असलेले गुन्हे
- कलम 408 प्रमाणे केलेले अर्ज
- सर्वोच्च न्यायालयाने वेळ ठरवून दिलेले खटले

डॉक्टरांनो खाजगी हॉस्पिटलसोबतचे 'हित'संबंधांचे नाते तोडा; रुबल अग्रवाल यांची ताकीद

दिवाणी दावे ः
- घटस्फोट किंवा लग्न अवैध ठरविण्यासाठी दाखल दावा
- पोटगी देण्यासंदर्भातील याचिका
- मुलांचा ताबा मिळण्याबाबत दाखल केलेले अर्ज
- मृत्यू किंवा जखमी व्यक्तीबाबत नुकसान भरपाईसाठी केलेले दावे
- देशातील अर्जदार असलेल्या पालकांना मुले दत्तक घेण्याची प्रक्रिया
- दिवाणी प्रक्रिया संहितेतील कलम 24 नुसारचे अर्ज
- वरिष्ठ न्यायालयांनी निष्कर्ष काढण्याचे आदेश दिलेले प्रकरण

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक पक्षकार व वकिलांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे दोन शिफ्टमध्ये कामकाज ठेवले तर प्रादुर्भाव जास्त वाढण्याची शक्‍यता वाटते. त्यामुळे एका शिफ्टमध्ये कामकाज ठेवावे, अशी विनंती पुणे बार असोसिएशनकडून प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना करण्यात आली आहे.-ऍड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The court proceedings will take place in two shifts