कोरोनाचा धोका वाढतोय; दौंड तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोना, एकाने गमावला जीव

अमर परदेशी
Friday, 19 February 2021

दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड परीसरात कोरोनाचा चांगलाच फैलाव वाढला आहे. वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदकीय अधिकारी यांनाही आता कोरोनाची बाधा झाली आहे.

वरवंड - दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड परीसरात कोरोनाचा चांगलाच फैलाव वाढला आहे. वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदकीय अधिकारी यांनाही आता कोरोनाची बाधा झाली आहे. तर पाटस येथे एका कोरोना बाधीत जेष्ठ व्यक्तीचा उपचारा दरम्यान रात्री मृत्यू झाला, या वृत्ताची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी पृष्टी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा:कथित गैरव्यवहारप्रकरणात अजित पवारांसह ७६ जणांना क्लीन चीट

काही दिवसाच्या विश्रांतीनंतर तालुक्यातील पाटस, वरवंड या मोठया गावांमध्ये कोरोना संसर्ग झपाटयाने वाढत चालला आहे. मागील पंधरा दिवसांत पाटस परीसरात एकुण 16 जणांना कोरानाची बाधा झाली. त्यापैकी दहा जणांची प्रकृती ठीक झाली असुन सहा जणांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. वरवंड येथे 8 जणांना कोरानाची बाधा झाली. पाच जणांची प्रकृती व्यवस्थीत असुन 3 जणांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकीय अधिकारी यांना दोन दिवसापासुन सर्दी,खोकला त्रास होत होता. तपासणी नंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पाटस येथे रात्री एका कोरोना बाधीत जेष्ठ व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर ससुन येथे उपचार सुरु होते. त्यांच्या घरातील इतर कोरोना बाधीत नातेवाइकांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाची संख्या वाढत असताना देखील याबाबत कोणतेच गांर्भीय ग्रामस्थ घेत नसल्याचे दिसुन येत आहे. चौकात गर्दीचे प्रमाण वाढले आहे. कुसेगाव येथेही एकास कोरोनाची बाधा झाली. कोरोनाचा फैलाव वाढत असुन नागरीकांनी दक्षता बाळगावी. तोंडावर मास्क वापरावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आरोग्याचा कोणाताही त्रास भेडसावल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका अधिकारी डॉ. पोळ यांनी केले.

मांढर परिसरात बिबट्या दहशत: शेतकऱ्यावर हल्ला

दरम्यान,पोलिस ,आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांनी एकत्रीत बैठक घेवून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी योग्य ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर किंबहुना गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही अनेक जण करू लागले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 medical office test positive one death in daund taluka pune district