esakal | Corona - पुण्यात 104 ठिकाणी मिळणार लस; पाहा तुमच्या जवळचं केंद्र
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccin

पुण्यात कोरोना प्रतिबंधक लस देणाऱ्या केंद्रांनी गुरुवारी शतक केले. महापालिकेत आता १०४ केंद्रांवर लसीकरण होणार असून, त्यापैकी ५७ रुग्णालये सरकारी आहेत.

Corona - पुण्यात 104 ठिकाणी मिळणार लस; पाहा तुमच्या जवळचं केंद्र

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - पुण्यात कोरोना प्रतिबंधक लस देणाऱ्या केंद्रांनी गुरुवारी शतक केले. महापालिकेत आता १०४ केंद्रांवर लसीकरण होणार असून, त्यापैकी ५७ रुग्णालये सरकारी आहेत. उर्वरित ४७ खासगी रुग्णालयांमध्ये ही केंद्र सुरू झाली आहेत. जानेवारीमध्ये लसीकरण सुरू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील औंध येथील जिल्हा रुग्णालयात भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे २० हजार डोस आले होते. इतर ठिकाणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ लशींचा पुरवठा केला होता. गेल्या तीन दिवसांपासून केंद्राने पुण्याला कोव्हॅक्सिन लसीच्या डोसचा पुरवठा केला आहे. देशासह पुण्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. त्याच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि नंतरच्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर यांना लस दिली. हे दोन्ही टप्पे पूर्ण होत असतानाच १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षे वयाच्या सहव्याधी असलेल्यांच्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला.

पुण्यात या टप्प्याच्या पहिल्या दिवशी अवघ्या चार केंद्रावर लसीकरण झाले. त्यात ससून रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय, सुतार दवाखाना आणि राजीव गांधी रुग्णालयाचा समावेश होता. गेल्या १८ दिवसांमध्ये लसीकरण केंद्रांची संख्या शंभरने वाढविण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. त्यात खासगी रुग्णालयांचीही मदत घेतल्याची माहिती महापालिकेने दिली.

हे वाचा - देशात महाराष्ट्र बनला कोरोनाचा हॉटस्पॉट; पुणे, मुंबई, नागपूरमध्ये वेगानं फैलाव

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

16 केंद्रांवर ‘कोव्हिशिल्ड’ लस
पुण्यातील १६ केंद्रांवर ‘कोव्हिशिल्ड’ लस देण्यात येत आहे. विशेषतः ज्यांनी पहिला डोस कोव्हिशिल्डचा घेतला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी ही केंद्र सुरू केल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या सोळापैकी ससून रुग्णालयात दोन केंद्र असून उर्वरित ठिकाणी केंद्र कार्यान्वित केले आहेत. त्यात येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय, मालती काची हॉस्पिटल (गाडीखाना), महंमदवाडी येथील भानगिरे रुग्णालय, डॉ. नायडू रुग्णालय, नामदेवराव शिवरकर रुग्णालय, अण्णासाहेब मगर रुग्णालय, सिंहगड रस्त्यावरील मुरलीधर लायगुडे, इनलॅक्स, फुरसुंगी येथील शिवराम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, जहागीर, पूनावाला, मेडिपॉइंट हॉस्पिटलचा समावेश आहे.
 

loading image