esakal | लवकरच बारामतीत होणार कोविड केअर सेंटर

बोलून बातमी शोधा

covid19

लवकरच बारामतीत होणार कोविड केअर सेंटर

sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती : येथील उपविभागीय अधिका-यांना आम्ही जागेची मागणी केली असून त्यांनी परवानगी देताच नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये आम्ही कोविड केअर सेंटर सुरु करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर, नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांनी आज दिली. बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनावर टीकास्त्र सोडताना केवळ एकाच पदाधिका-याला विश्वासात घेत प्रशासन काम करत असून नगराध्यक्षांनीही या संकटाच्या काळात नगरसेवकांना कधीच विश्वासात घेतला नसल्याचा आरोप केला.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

अँड. पाटसकर म्हणाले, बारामतीतील प्रशासन एकाच व्यक्तीला घेऊन काम करते आहे, इतरांना विश्वासात घेत नाही, उपमुख्यमंत्र्यांना एसएमएस केले पण त्यांना कामाचा व्याप असल्याने कदाचित त्यांनी उत्तर दिले नसेल, शेवटी घटनात्मक प्रमुख या नात्याने मी राज्यपालांना बारामतीच्या प्रशासनाला निर्देश देण्याची विनंती केली होती. यात उपमुख्यमंत्र्यांची किंवा बारामतीची बदनामी व्हावी असा अजिबात हेतू नव्हता किंवा कोणाला आम्ही लक्ष्यही केले नव्हते. सुनिल सस्ते म्हणाले, विविध ठिकाणी लसीकरण सुरु झाले तर त्याचा नागरिकांनाच फायदा होईल या हेतूने मी लसीकरण केंद्र सुरु करण्याची परवानगी मागितली होती, अधिकारी एका व्यक्तीच्या प्रभावाखाली काम करत असल्याने ढोल बजाव आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आंदोलनाच्या इशा-यानंतर आम्हाला परवानगी मिळाली. वास्तविक शहरातील सर्व मतदान केंद्रावर लसीकरण सुरु झाले तर सर्वांनाच ते सोयीचे होईल.

हेही वाचा: पुणे : गुन्हेगाराला अटक करण्यास गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार

अधिकारी आणि नगराध्यक्षांनीही ना नगरसेवक किंवा इतर पदाधिका-यांना कधीच विश्वासात घेतले नाही, आम्हालाही राजकारण करायचे नाही पण कार्यकर्ते व पदाधिका-यांसह अनेकांची कोविड केअर सेंटर सुरु करण्यासह इतरही काम करण्याची इच्छा आहे, पण त्यांना संधीच दिली जात नाही, असा आरोप सस्ते यांनी केला. अधिकारी खुर्चीच सोडायला तयार नाहीत-अधिकारी आपली खुर्ची सोडत नाहीत आणि शहरातील पदाधिकारी किंवा नगरसेवकांना कोणी विश्वासात घ्यायला तयार नाही, पक्षीय प्रमुख सर्व बैठकांना हजर असतात, इतरांना कोणी विश्वासातच घेत नाही, हे दुर्देवी असल्याचा आरोप या वेळी केला गेला.