esakal | पुण्यात आज 60 केंद्रावर मिळणार कोविशील्ड, 16 ठिकाणी कोव्हॅक्सीन
sakal

बोलून बातमी शोधा

Covishield Covaxin

पुण्यात आज 60 केंद्रावर मिळणार कोविशील्ड, 16 ठिकाणी कोव्हॅक्सीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत उद्या (शुक्रवारी) ६० केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे. सर्व डोस हे कोविशील्ड लसीचे असून उपलब्ध साठ्यापैकी ६० टक्के लस ही ४५ वर्षे वयावरील नागरिकांना पहिला डोस देण्यासाठी राखीव असणार आहे. तर कोव्हॅक्सिन लस ही १६ केंद्रांवर उपलब्ध असणार आहे.

४५ वर्षे वयापुढील नागरिकांनी १९ मार्चपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना शुक्रवारी लस मिळू शकणार आहे. ६० टक्के लस ही ४५ वर्षे पुढील नागरिकांना पहिल्या डोससाठी दिली जाईल. मात्र, यासाठी ऑनलाइन बुकिंग आवश्‍यक आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता त्याचे ऑनलाइन बुकिंग करता येऊ शकणार आहे.

हेही वाचा: म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंजेक्शन उपलब्ध

उर्वरित लस ही दिव्यांग, स्तनदा माता, हेल्थकेअर, फ्रंट लाइन वर्कर्स यांना प्राधान्याने दिली जाईल. याशिवाय ज्या नागरिकांनी नोंदणी केली नाही, परंतु ते केंद्रांवर आले असतील आणि लस शिल्लक असेल तर त्यांना ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून ती देण्यात येईल. तर सोळा केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे लसीकरण सुरू राहणार आहे. उपलब्ध साठ्यापैकी १४ मेपूर्वी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, अशा साठ टक्के नागरीकांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य राहणार आहे. तर उर्वरित ४० टक्के लस ही ‘ऑन द स्पॉट’ नोंदणी करून दिली जाणार आहे.

हेही वाचा: ‘घरात येऊ, कोरोना लस देऊ’; पुण्यात उपक्रम सुरु