esakal | अहो काय सांगता, चक्क गवऱ्या विकल्या अॅमेझॅानवर !

बोलून बातमी शोधा

अहो काय सांगता,  चक्क गवऱ्या विकल्या अॅमेझॅानवर !
अहो काय सांगता, चक्क गवऱ्या विकल्या अॅमेझॅानवर !
sakal_logo
By
टीम सकाळ

केडगाव : तंत्रज्ञानाचा आधार घेत जगाच्या पाठीवर कोण काय विकेल, हे सांगता येत नाही. त्यातीलच एक प्रकार म्हणजे नानगावातील (ता. दौंड ) महिलांनी चक्क अॅमेझॅानवर शेणाच्या गवऱ्या विकण्यास सुरवात केली आहे आणि तेलंगणामधून त्यांना शंभर गवऱ्यांची मागणीही आली आहे. या मागणीचे पार्सल आज पोस्टाने तेलंगणाकडे पाठविण्यात आले.

दौंड तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आश्लेषा शेलार यांनी पाच वर्षापूर्वी श्री महिला बचत गटाची स्थापना केली. मागील काळात बचतगट जेमतेम चालू होता. शेलार यांनी गवऱ्या थापण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. त्यावेळी काही महिलांनी नाके मुरडली. अॅमेझॅानवर या व्यवसायाची नोंदणी केली. सध्या तिथे १५ रूपयांना एक गवरी विकली जात आहे. नानगावातील गवऱ्यांना पुणे, मुंबई, दिल्ली याचबरोबर तेलंगणातूनही मागणी आहे. हा व्यवसाय तालुक्यात कौतुकाचा विषय झाला आहे.

हेही वाचा: ‘जम्बो’मध्ये ऑक्सिजन बचतीचा प्रयोग

हेही वाचा: पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

प्रथम मागणीचे कुरियर केडगाव पोस्ट ऑफिसमधून आज तेलंगणास पाठविण्यात आले. यावेळी आश्लेषा शेलार, नानगाव-पारगाव बचत गटाच्या अध्यक्षा निर्जला गुंड, उपाध्यक्षा कविता मोटे, केडगावचे पोस्टमन गजानन बारस्कर व गौरव ब्राह्मणकर, नानगावचे पोस्टमन काका गुंड व अमीर काजी उपस्थित होते.

आश्लेषा शेलार म्हणाल्या, ‘‘लॅाकडाउनमध्ये महिलांना रोजगार देण्याच्या दृष्टीने हा घरबसल्या व्यवसाय सुरू केला आहे. आगामी काळात या व्यवसायाची व्याप्ती वाढविणार आहे.’’

उदबत्तीचे उत्पादनही सुरू

केडगावातील महिला स्वतःच्या पशुधनापासून घरीच गवऱ्या बनविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च तसा नगण्य आहे. गवऱ्यांचा साठा करून ठेवला जात आहे. अग्निहोत्र व इतर धार्मिक विधीसाठी शहरातून गवऱ्यांना मागणी आहे. बचत गटाच्या माध्यमातून उदबत्तीचे उत्पादन चालू आहे. मसाला विक्री लवकरच सुरू करण्यात येणार आहे.