esakal | दौंडला दिलासा; कोविड सेंटरमध्ये नवीन 100 बेडची भर

बोलून बातमी शोधा

covid center
दौंडला दिलासा; कोविड सेंटरमध्ये नवीन 100 बेडची भर
sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरला क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष (credai national president) सतीश मगर (satish magar) यांनी दिलेल्या 100 बेडचे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात (ramesh thorat) यांच्या हस्ते लोकार्पण झाले. पूर्वीचे 100 व नवीन 100 बेडची भर पडली. त्यामुळे 200 बेडची क्षमता असलेले स्वामी चिंचोली हे दौंड तालुक्यातील (daund taluka) सर्वात मोठे कोविड सेंटर (covid center) झाले आहे.(credai national president satish magar donated 100 beds to the covid center at daund taluka).

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात

दौंड तालुक्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोविड सेंटरमध्ये बेड कमी पडत आहेत. त्यामुळे स्वामी चिंचोली कोविड सेंटरला बेड उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंडाईचे अध्यक्ष सतीश मगर यांच्याकडे केली होती. त्यानुसार मगर यांनी 100 कोट, गादी, बेडशिट, सतरंज्या उपलब्ध करून दिल्या.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला

दरम्यान, या बेडचे लोकार्पण रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती सयाजी ताकवणे, पंचायत समिती सदस्य प्रकाश नवले, माजी उपसभापती उत्तम आटोळे, वैद्यकीय अधिकारी शिंदे, स्वामी चिंचोलीचे उपसरपंच प्रकाश होले, मच्छिंद्र मदने आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई