esakal | Fight with Corona : कोरोनावर मात करण्याच्या मोहिमेत केदार जाधवही!
sakal

बोलून बातमी शोधा

Kedar-Jadhav

कोरोनामुळे गेल्या दहा दिवसांपासून मी कोथरूड मधील घरातच आहे. आई-वडिलांची काळजी घेतानाच माझी पाच वर्षाची मुलगी निराया आणि पत्नी बरोबर वेळ घालवत आहे.

Fight with Corona : कोरोनावर मात करण्याच्या मोहिमेत केदार जाधवही!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरने (एमसीसीआयए) सुरू केलेल्या मोहिमेत भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवही शुक्रवारी (ता.३) सहभागी झाला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या संकटाची तीव्रता वाढू लागल्यामुळे 'एमसीसीआयए'ने सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून पुढाकार घेऊन निधी संकलनाला सुरुवात केली आहे. त्यातून आरोग्य सेवकांना पुरेशी साधने उपलब्ध करून देणे, एन- 95 चे पुरेसे मास्क उपलब्ध करून देणे आणि रुग्णालयांना व्हेंटीलेटर उपलब्ध करून देणे, यावर 'एमसीसीआयए'ने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शहरातील अनेक उद्योग समूहांनी 'एमसीसीआयए'च्या माध्यमातून हातभार लावला आहे.

- 'तबलिगी जमात'मध्ये आले होते ४१ देशांचे नागरिक; ९६० जणांची यादी जाहीर!

 भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे यानेही या मोहिमेत भाग घेतला आहे. केदार जाधव या बाबत म्हणाला," समाजाला करून कोरोनाचे दूर करण्यासाठी लढण्याची गरज आहे. त्यासाठी 'एमसीसीआयए'च्या उपक्रमात मी  सहभागी झालो आहे. मुख्यमंत्री निधीसाठी ही मदत करणार आहे.  समाजातील जास्तीत जास्त लोकांनी  या विधायक कार्यासाठी हातभार लावावा, असे माझे आवाहन आहे."

- Lockdown : मेडिकलमध्ये जायचंय? काळजी करू नका, आता औषधेही मिळणार घरपोच!

'एमसीसीआयए'चे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, "कोरोनाचा सामना पुरेशा साधनांनी करण्यासाठी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एन- 95 चे 10 हजारपेक्षा जास्त मास्क आणि काही व्हेंटीलेटर आम्ही राज्य सरकारकडे सोपविले आहेत. तसेच 'पीपीइ'चे किट्स ही मोठ्या संख्येने परदेशातून मागविले आहेत. आठ दिवसांत ते सरकारकडे सोपविले जातील." चेंबरच्या या उपक्रमाला उद्योग क्षेत्राचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

या उपक्रमासाठी यापूर्वी फोर्स मोटर्स, ब्रिजस्टोन इंडिया, आंत्रेप्रेन्यूर्स ऑर्गनायझेशन, एसएनएस  फाउंडेशन आणि देसाई ब्रदर्स या उद्योगसमूहांनी हातभार लावला आहे. 

- Coronavirus : जागतिक बँक भारताच्या मदतीला; सर्वाधिक निधीची तरतूद

पुणेकरांनो घरीच थांबा 

"कोरोनामुळे गेल्या दहा दिवसांपासून मी कोथरूड मधील घरातच आहे. आई-वडिलांची काळजी घेतानाच माझी पाच वर्षाची मुलगी निराया आणि पत्नी बरोबर वेळ घालवत आहे. आम्ही चौघेही घरी दररोज व्यायाम करीत आहोत. तसेच सगळ्या नागरिकांनाही घरीच थांबावे आणि कोरोनावर मात करावी,'' असे आवाहनही केदारने पुणेकरांना केले.