
या प्रकरणी महाविकास आघाडी पॅनेलचे कुंडलिक रामभाऊ सोनवणे, साहिल अनिल भोर (रा. भोरवाडी, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायणगाव : वडगाव (भोरवाडी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करावे या साठी मतदारांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने खाद्य तेलाचे कॅड वाटप करून निवडणुक आचारसंहितेच भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.
अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई
या प्रकरणी महाविकास आघाडी पॅनेलचे कुंडलिक रामभाऊ सोनवणे, साहिल अनिल भोर (रा. भोरवाडी, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत गुंड म्हणाले आरोपींनी वडगाव (भोरवाडी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पॅनल तयार केला आहे. गुरुवारी (ता. १४) रात्री आरोपी मतदारांना साहित्य वाटप करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार पोलीस कर्मचारी योगेश गारगोटे यांनी भोरवाडी येथे जाऊन तपास केला.
पुण्याच्या दक्षिण भागाला आता दररोज पाणीपुरवठा
दरम्यान, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी देविदास दगडू भोर यांना पाच लिटर मापाचे सुपर सोया कंपनीचे तेलाचे तीन कँड (किंमत१५००/-रू) देत असताना आढळून आले.या प्रकरणी कुंडलिक सोनवणे, साहिल भोर यांच्यावर भा.द.वि कलम १७१(इ),१८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)