राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत वाद; भाडोत्री गुंडांकडून कोयत्याने वार | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत वाद; भाडोत्री गुंडांकडून कोयत्याने वार

केडगाव : पारगाव ( ता.दौंड ) येथील रेणूकादेवी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाडोत्री गुंडाच्या मार्फत संचालकांवर कोयत्याने करण्यात आले आहेत. (Crime In Daund) यात दोन जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर गुंड फरार झाले आहेत. हे गुंड पारगाव येथील व पिंपरी चिंचवड येथे राहणा-या एका उद्योजकाने आणल्याचा आरोप संस्थापक पोपटराव ताकवणे यांनी केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संस्थेचे संस्थापक पोपटराव ताकवणे निवडून आले आहेत. रेणुकादेवी दूध संस्था ही दौंड तालुक्यातील सर्वात मोठी दूध संस्था आहे. (Pune District Crime News)

रेणूकादेवी दूध डेअरीच्या संचालक मंडळाची निवडणूक काही दिवसांपुर्वी पार पडली. दूध संस्थेत संबंधित उद्योजकांना संचालक म्हणून घेण्यात आले आहे. या संचालकांना कात्रज डेअरीच्या निवडणुकीत प्रतिनिधी म्हणून जायचे होते. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यातच डेयरीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संस्थापक अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांनी त्यांच्या मर्जीतील संचालक सहलीला घेऊन गेले.

हेही वाचा: दुचाकी व ट्रकच्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू; ट्रकचालक फरार

आज दुपारी मतदानाच्याच्यावेळी सहलीवर गेलेल्या संचालकांची गाडी संस्थेच्या प्रवेशव्दाराजवळ आली असताना फॅारच्युनर गाडीतून उतरलेल्या गुंडाना संचालकांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना गुंगारा देत संचालक संस्थेत पोहचले. या झटापटीत भाडोत्री गुंडांनी दोन जणांवर वार करण्याचा प्रयत्न केला. संस्थापक पोपटराव ताकवणे यांचा मुलगा रामकृष्ण ताकवणे यांच्यावर कोयत्याने वार होत असताना भीमा पाटस कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे यांनी गुंडास अडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते जखमी झाले.

सचिन ताकवणे हेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. दरम्यान या गोंधळाच्या वातावरणात निवडणुक पार पडली. या घटनेनंतर ग्रामस्थ जमा होऊ लागले. या गोंधळातच गुंडांनी तेथून पलायन केले. या घटनेमुळे गावात दुपारी तणावाचे वातावरण होते. त्यामुळे घटनास्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात पोपटराव ताकवणे बिनविरोध निवडणूक आले.

हेही वाचा: पुणे : नळाला येतंय थेट धरणातलं दूषीत पाणी

अध्यक्ष निवडीनंतर संस्थेच्या कार्यालयांमध्ये निषेध सभा घेण्यात आली. यावेळी संस्थापक ताकवणे ,सयाजी ताकवणे, अरुण बोत्रे,सर्जेराव जेधे, मच्छिंद्र ताकवणे ,सोमनाथ ताकवणे यांनी सदर घटनेचा निषेध केला. यावेळी सुभाष बोत्रे, संभाजी ताकवणे, दत्तात्रय ताकवणे, मधुकर ताकवणे, रवी ताकवणे, किसन जगदाळे, स्वामी शेळके आदी उपस्थित होते. दरम्यान सायंकाळपर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही.

यासंदर्भात पोपटराव ताकवणे म्हणाले की हा सर्व प्रकार उद्योजक विकास ताकवणे यांनी केला आहे प्रतिनिधी म्हणून जिल्हा दूध संघावर जाण्याची प्रक्रिया चार महिन्यापूर्वी पार पडलेली आहे. भाडोत्री गुंडांना सुपारी देऊन गावात दहशत निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या विरोधात आम्ही पोलिसात तक्रार देत आहोत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी याची दखल घ्यावी.

विकास ताकवणे म्हणाले मी दूध संस्थेच्या कार्यालयात होतो. प्रवेशद्वारावर बाहेर काय झाले मला माहीत नाही. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. पोपट दाखवणे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा अर्ज नव्हता आज मी फक्त त्यांना एकच सांगत होतो की मला अध्यक्षपद नको परंतु मला कात्रज दूध संघाच्या निवडणुकीसाठी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड करा मात्र त्यास पोपट ताकवणे तयार नव्हते. संस्थेच्या प्रगतीत आमच्या कुटुंबियांचा वाटा आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newscrime
loading image
go to top