
पुणे : शुल्लक वाद आणि पूर्व वैमनस्यातून खुन केल्याच्या घटना शहरात वाढतच आहे. गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या कारणावरुन सहा खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जनजीवन सुरळीत झाल्यानंतर खुनाचे सत्र देखील सुरू झाल्याचे स्पष्ट होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विश्रांतवाडीतील धानोरी भागात एकाने वादातून मेहुण्याचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. अक्षय सुरेश गागोदेकर (वय 24,रा. गोकुळनगर, धानोरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षयच्या बहिणीचा पती इंद्रजीत गुलाब गायकवाड आणि साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयची आई मथुरा यांनी यासंदर्भात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयची बहिण आणि आरोपी इंद्रजीत यांची ओळख आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते एकत्र राहत आहेत. विवाह न करता दोघेजण एकत्र राहत असल्याने अक्षय इंद्रजीतवर चिडून होता. गोकुळनगर येथील मोकळ्या मैदानावर मध्यरात्री अक्षय, इंद्रजीत आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अक्षय आणि इंद्रजीत यांच्यात वाद झाला. त्या
वादातून इंद्रजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी अक्षय आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला मारहाण करण्यास सुरूवात केली. अक्षयला दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक रवींद्र कदम तपास करत आहेत.
यापूर्वी घडलेल्या घटना:
शहरात गेल्या आठवडाभरात खुनाच्या घटना वाढीस लागल्या असून आतापर्यंत सहा खून झाले आहेत. येरवडा भागात किरकोळ वादातून केटरिंग व्यावसायिक प्रतीक वन्नाळे याचा खून झाला होता. हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात वर्चस्वाच्या वादातून बसवराज कांबळे याचा खून झाला होता. त्यानंतर येरवडा भागात आणखी एका सराइताचा खून झाला. क्वीन्स गार्डन भागात कौटुंबिक वादातून एकाने मेहुण्याचा खून केला होता. तर वानवडी भागात मृतावस्थेत सापडलेल्या ज्योती दीपक कांबळे (वय 35, रा. मंजुळाबाई चाळ, भवानी पेठ) यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे.
तीक्ष्ण शस्त्राने वार :
बोपोडी भागात एका युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. शुभम सावंत (वय 22, रा. भालेकरनगर, पिंपळे गुरव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. सावंत याने यासंदर्भात खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम आणि त्याचा मित्र अजय कांबळे दुचाकीवरून किराणा माल घेऊन निघाले होते. त्यावेळी बोपोडीतील कुंदन पॅलेसजवळ तिघांनी शुभमला अडवले. त्याला मारहाण करून डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक अमोल भोसले तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.