'कर्जमाफीचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना...'; उपमुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेकडे केली 'ही' मागणी!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय राजकीय नेत्यांची गुरुवारी बैठक झाली.

पुणे : पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेला विनंती करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता.७) झालेल्या बैठकीत सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "ज्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरु आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषधे, बियाणे कमी पडणार नाही."

- अरे बापरे! एक नव्हे, दोन नव्हे तर भारताच्या १०० पट जास्त कोरोनाचा कहर अमेरिकेत!

कापूस खरेदीसंदर्भात केंद्राशी बोलणे सुरु आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. २५ हजार मेट्रिक टन ज्वारी आणि १५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे,  अशीही माहिती त्यांनी दिली. 

- दारु विकत घेणाऱ्यांची चेष्टा करताय, मोबाइलवर त्यांचे फोटो काढताय...तर ही बातमी वाचाच!

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय राजकीय नेत्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांची भूमिका मांडली.

- पुणेकरांसाठी मोठी बातमी : दुकानांच्या वेळांबाबत पुन्हा नवीन आदेश

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे  मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar has demanded that crop loans be given to farmers