esakal | पुणेकरांनो, संकट टळलेलं नाही; २१३ दिवसांत तीन लाखाहून अधिकांना कोरोनाची लागण!
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

पुणे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अद्याप टळलेली नाही. यावर मात करण्यासाठी काळजी हवीच. त्यासाठी नागरिकांनी पुढचे काही महिने सामाजिक अंतर पाळणे, मास्क बांधूनच बाहेर पडणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, अनावश्‍यक गर्दी न करणे आणि प्राथमिक लक्षणे दिसताच, कोरोना चाचणी करणे, या बाबींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी गुरुवारी (ता.8) व्यक्त केले.

पुणेकरांनो, संकट टळलेलं नाही; २१३ दिवसांत तीन लाखाहून अधिकांना कोरोनाची लागण!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अद्याप टळलेली नाही. यावर मात करण्यासाठी काळजी हवीच. त्यासाठी नागरिकांनी पुढचे काही महिने सामाजिक अंतर पाळणे, मास्क बांधूनच बाहेर पडणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, अनावश्‍यक गर्दी न करणे आणि प्राथमिक लक्षणे दिसताच, कोरोना चाचणी करणे, या बाबींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी गुरुवारी (ता.8) व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू होण्याच्या घटनेस गुरुवारी 213 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत एकूण कोरोना रुग्णांचा तीन लाखांचा आकडा पार झाला आहे. आतापर्यंतचे एकूण रुग्ण आणि कालावधीची तुलना केल्यास, दररोज सरासरी 1 हजार 405 नवे रुग्ण सापडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण 9 मार्चला पुणे शहरात सापडला होता. पहिल्या कोरोना रुग्णांचा मृत्यू 31 मार्चला झाला होता. पहिल्या रुग्णांपासून 151 दिवसानंतर एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख, 183 दिवसांनंतर दोन लाख तर, आता 213 दिवसांनंतर तीन लाख ओलांडला गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील

पुणे शहर
- एकूण कोरोना रुग्ण --- 1 लाख 51 हजार 402.
- सक्रिय रुग्ण (ऍक्‍टिव्ह) --- 14 हजार 70.
- कोरोनामुक्त झालेले रुग्ण --- 1 लाख 33 हजार 600.
- मृत्यू --- 3 हजार 879.

वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी

पिंपरी चिंचवड
- एकूण कोरोना रुग्ण --- 81 हजार 942.
- सक्रिय रुग्ण (ऍक्‍टिव्ह) --- 4 हजार 496.
- कोरोनामुक्त झालेले रुग्ण --- 76 हजार 50.
- मृत्यू --- 1 हजार 396.

जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण रुग्ण (जिल्हा परिषद कार्यक्षेत्र)
- 501 ते 1000 - वेल्हे
- 1001 ते 2000 - बारामती, भोर, दौंड, पुरंदर.
- 2001 ते 3000 - इंदापूर, जुन्नर, मावळ.
- 3001 ते 4000 - आंबेगाव, मुळशी आणि शिरूर.
- पाच हजारांहून जास्त - खेड.
- पंधरा हजारांहून अधिक - हवेली.

पुणे जिल्ह्यातील कोरोना उद्रेक दृष्टिक्षेपात..
- पहिला रुग्ण - 9 मार्च 2020.
- एक लाख रुग्ण - 6 ऑगष्ट 2020.
- दोन लाख रुग्ण - 7 सप्टेंबर 2020.
- तीन लाख रुग्ण - 8 ऑक्‍टोबर 2020.
- 213 दिवसांत 3 लाख रुग्ण
- दररोज सरासरी नवे रुग्ण - 1 हजार 405.
- आतापर्यंतचे एकूण मृत्यू - 6 हजार 670.
- दररोजचे सरासरी मृत्यू - 31.

Edited By - Prashant Patil