अरे बापरे! पुणे महापालिकेत समाविष्ट नव्या गावांसाठी हवेत तब्बल एवढे करोड रुपये

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - पुणे महापालिकेत नव्याने समावेश होणाऱ्या २३ गावांना पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्यासारख्या किमान सेवा-सुविधा पुरविण्यासाठी दहा हजार कोटी रुपये हवेत. ही गावे महापालिकेत येताच पहिल्या वर्षी हजार-दीड हजार कोटी रुपयांची कामे करावी लागणार असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. 

मात्र, आधीच कोरोनाने तिजोरीत खडखडाट असताना हे पैसे कोठून आणायचे, असा प्रश्‍न महापालिकेपुढे तूर्तास उभा आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हद्दीलगतच्या ३४ पैकी ११ गावांच्या समावेशानंतर उर्वरित २३ गावे महापालिकेत घेण्याच्या हालचाली करीत, या गावांच्या विकासाचे नियोजन करण्याची तयारी राज्य सरकारने चालविली आहे. त्यातून महापालिका आणि आता जिल्हा प्रशासनाकडून अभिप्राय मागविला आहे. विशेषत: पुणे महापालिकेची मूळ हद्द या आधीच्या ११ गावांचा समावेश, नवी २३ गावे, त्यांचे क्षेत्रफळ, त्यातील विकासकामे या अनुषंगाने सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढच्या तीन-चार महिन्यांत या गावांचा समावेश निश्‍चित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महापालिकेच्या आगामी निवडणुका २०२२ मध्ये होणार आहेत. त्यादृष्टीने आता गावांना सामावून घेत नवी राजकीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न आघाडी सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार करीत असल्याचे स्पष्ट आहे. ही गावे घेऊन नव्या प्रभागांची रचना करायची आणि पुणे महापालिकेत सत्तांतर करण्याचाही हेतू यामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून पवार हा आपल्या भूमिका पुढे सरकावत आहेत.

अजित पवार यांचा पुढाकार
हद्दीलगतची ३४ गावे टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यात म्हणजे २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करून घेतला. त्यानंतर उर्वरित गावे तीन वर्षांत घेण्यात येतील, असे जुन्या सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात न्यायालयाला सांगितले होते. मात्र त्यानंतरच्या काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विशेषत: उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी २३ गावे महापालिकेत घेण्यावर भर दिला आहे.

महापालिकेच्या हद्दीत सर्वसमावेशक विकास व्हावा, यासाठी नव्या गावांतील नियोजनबद्ध विकासकामे अपेक्षित आहेत. त्यासाठी पुरेशा प्रमाणात आणि वेळीच निधी उभारण्यासाठी नवेनवे प्रयोग अर्थात नगर नियोजनाच्या योजना राबविण्यावर भर देण्याची गरज आहे.  
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com