दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

खासगीरित्या फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइनद्वारे नाव नोंदणी करायची आहे. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या फॉर्म नंबर १७ भरून नियमित शुल्कासह ऑनलाइन नाव नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना येत्या रविवारपासून (ता.२९) ते ३० डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह नावनोंदणी करता येणार आहे.

व्याजाच्या पैशांवरुन व्यावसायिकाचे अपहरण करुन बेदम मारहाण 

खासगीरित्या फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइनद्वारे नाव नोंदणी करायची आहे. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. या विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याच्या पोचपावतीच्या दोन छायाप्रती, मुळ कागदपत्रे अर्जावर दिलेल्या संपर्क केंद्रात येत्या सोमवार (ता.३०) ते ३१ डिसेंबर दरम्यान जमा करावीत, अशी सूचना राज्य मंडळाने दिली आहे.

इंजिनिअरींगसह सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार

विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीचा अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर; तर बारावीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे राज्य मंडळाने सांगितले आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी देणे अनिवार्य आहे. दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्त्यानुसार आणि त्यांनी निवडलेल्या माध्यमनिहाय संपर्क केंद्रांची यादी दिसेल. त्यातील एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांना करायची आहे. या संपर्क केंद्रामार्फत संबंधित विद्यार्थ्यांचे प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज केले जाईल.

पुणे विद्यापीठ : परीक्षा विभागात विद्यार्थ्यांला बेदम मारहाण​

बारावीसाठी खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करताना त्यांचा पत्ता, निवडलेली शाखा व माध्यमनिहाय कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल. त्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांनी करायची आहे. विद्यार्थ्यांनी या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक/ तोंडी परीक्षा द्यायची आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास ०२०-२५७०५२०७ आणि २५७०५२०८ तसेच २५७०५२७१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगतिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students have been given an extension to fill up Form No 17 for SSC and HSC exam