बारामतीत जवानाला मारहाण होणे लाजीरवाणे: अजित पवार (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

तालुक्यातील सोनगाव येथील सीआरपीएफचा जवान अशोक बाबुराव इंगवले याला आज बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप या जवानाने केला. यावर बोलताना आपल्या बारामतीत अशी गोष्ट घडत असेल तर ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असल्याची खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. 

बारामती- तालुक्यातील सोनगाव येथील सीआरपीएफचा जवान अशोक बाबुराव इंगवले याला आज बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप या जवानाने केला. यावर बोलताना आपल्या बारामतीत अशी गोष्ट घडत असेल तर ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट
असल्याची खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. 

बारामतीत पोलिसांकडून सीआरपीएफच्या जवानाला मारहाण-
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बारामतीत पोलिसांकडून सीआरपीएफच्या जवानाला मारहाण(व्हिडिओ)

अजित पवार म्हणाले, सीआरपीएफच्या जवानाला आपल्या बारामतीच्या पोलिस स्टेशनमध्ये 10-15 पोलिसांनी मारहाण केली आहे. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. आपण सगळेजण जय जवान जय किसानचा नारा देत असताना ही गोष्ट घडत असेल तर मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. पोलिसांना दिलेला अधिकार हा जवानांना मारण्यासाठी दिला आहे का? असा प्रश्नही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला.

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री गृहमंत्रीही आहेत. पोलिस खात्याचे प्रमुख आहेत. त्यांनी सर्वांना समज दिली पाहिजे सर्वांवर त्यांचा धाक असला पाहिजे असेही पवारांनी यावेळी सांगितले.

Web Title: CRPF Jawan Beaten By Police in Baramati is Shameless says Ajit Pawar