सध्याच्या लॉकडाउनचा कालावधी वाढवणार नाही : जिल्हाधिकारी राम

The current lockdown period will not be extended said Collector Ram
The current lockdown period will not be extended said Collector Ram
Updated on

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सध्या लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना त्रास झाला. मात्र जुलै महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हा दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा लागला. मात्र या दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (ता.२०) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काय करावं या पुणेकरांचं? सगळं बंद तरीही रस्त्यावर वर्दळ सुरूच!

यापुढे आठवड्यातून एकदा बंद पाळणे, प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध घालणे, रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध करून देणे यांसह विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही राम यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते म्हणाले, "पुणे शहरात जुलै महिन्यात खूपच वेगाने मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढू लागल्याचे निदर्शनास आले. यामुळे या रुग्ण वाढीवर नियंत्रण आणणे आवश्यक होते. यासाठी तातडीने दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. यापैकी पहिले पाच दिवस कडक लॉकडाउन करण्यात आला. त्यानंतरच्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये थोडीही शिथिलता दिली आहे. हा कालावधी येत्या २३ जुलैला संपत आहे. त्यांनतर सध्याच्या लॉकडाउनचा कालावधी वाढविला जाणार नाही."

हद्द झाली! पतंग उडविण्यास विरोध केल्याने 'त्या' तिघांनी काय केलं पाहा​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com