पुण्यातील फेसबुकवरील ती निघाली तो; अन् मग...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

पुणे : फेसबुकवरील अनोळखी महिलेशी मैत्री करणे कोंढव्यातील एका महिलेस चांगलेच महाग पडले आहे. पुरुषाने महिलेच्या नावे बनावट खाते तयार करून अश्‍लील चित्रफीत पाठवून पुण्यातील एका महिलेचा विनयभंग केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : फेसबुकवरील अनोळखी महिलेशी मैत्री करणे कोंढव्यातील एका महिलेस चांगलेच महाग पडले आहे. पुरुषाने महिलेच्या नावे बनावट खाते तयार करून अश्‍लील चित्रफीत पाठवून पुण्यातील एका महिलेचा विनयभंग केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, फेसबुकवरील ती नव्हे तो असल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली आहे. विजय पितांबर ढाळके (रा. अमृतनगर, घाटकोपर मुंबई मूळ रा. कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

भयानक : लँडिग होतानाच विमानाचे तीन तुकडे; प्रवाशांचे काय झाले फोटो नक्की पाहा

ढाळके याने महिलेच्या नावे फेसबुकवर बनावट खाते तयार केले. त्यानंतर कोंढवा परिसरात राहणा-या एका महिलेस फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. महिला असल्याचे समजून फिर्यादी महिलेने तिची रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर आरोपीने ओळख वाढविली तसेच फेसबुकवर अश्‍लील चित्रफीत आणि फोटो पाठवून दिले. आरोपी एवढ्यावर थांबला नाही. त्याने महिलेच्या पतीलाही महिलेचा चेहरा असलेली अश्‍लील चित्रफीत पाठविली. आरोपीने महिलेस व्हॉटसअप कॉल करीत त्रास दिला तसेच अश्‍लील चॅटिंग करून विनयभंग केला.

भारतीय कलाकारांना नाचवून तो भारतविरोधी कारवायांनाच करायचा फंडिंग

सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार, कर्मचारी अस्लम आतार, संतोष जाधव, शाहरुख शेख, गिरीमल्लेश चलवादी, उमा पालवे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करीत आरोपीचा पत्ता शोधून काढला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cyber crime on facebook in Pune Kondhava

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: