सावधान! पुण्यात तीन महिलांची लाखोंची फसवणूक; अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

औंधमधील एका महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने मेसेज पाठविला, त्यामध्ये पेटीएम अ‍ॅपची मुदत संपत आली असून अद्ययावत न केल्यास पेटीएम बंद पडेल, असा उल्लेख करण्यात आला होता.

पुणे : पेटीएम व मोबाईलचे सीमकार्ड अद्ययावत करणे व बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारानी शहरातील तीन महिलांची ऑनलाईन माध्यमाद्वारे तीन लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

औंधमधील एका महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने मेसेज पाठविला, त्यामध्ये पेटीएम अ‍ॅपची मुदत संपत आली असून अद्ययावत न केल्यास पेटीएम बंद पडेल, असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे महिलेने संबंधीत क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी संबंधीत व्यक्तीने महिलेला क्विक सपोर्ट अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. महिलेने हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर अनोळखी व्यक्तीने तिच्या बँक खात्यातील ८४ हजार ३१३ रुपये तत्काळ काढले. महिलेने चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) माया देवरे तपास करीत आहेत.

अनोळखी व्यक्तीने वानवडी भागातील एका महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्याने महिलेस आपण मोबाइल कंपनीतून बोलत असल्याचे सांगुन सीमकार्ड अद्ययावत न केल्यास मोबाइल सेवा बंद पडेल, अशी बतावणी केली. त्यानंतर त्याने महिलेकडुन तिच्या बँक खात्याची माहिती घेत महिलेला १२३४५ या क्रमांकावर संदेश पाठविण्यास सांगितले. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून चोरट्याने १ लाख १९ हजार रुपये काढून घेतले.

 

कोरोनानंतर कसं असणार कॉलेजमधील वातावरण? इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सांगितली त्यांची संकल्पना

तर खडकी येथे राहणाऱ्या एका 74 वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात ऑनलाईन फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या महिलेच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीने मेसेज पाठविला. त्यामध्ये बँक खात्यातील माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. माहिती न दिल्यास खाते बंद पडेल,अशी बतावणी त्यांना करण्यात आली. त्यानंतर त्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून महिलेचे बँक खाते, डेबीट कार्ड क्रमांकाची माहिती घेतली. त्यानंतर त्याने महिलेच्या बँक खात्यातून ९५ हजार रुपये लांबविले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) शफील  पठाण तपास करीत आहेत.

अशी घ्या काळजी 

 • अनोळखी व्यक्तीचे फोन, मेसेज, ईमेल किंवा लिंकला प्रतिसाद देऊ नका.
 • अनोळखी व्यक्तीला आपल्या डेबीट, क्रेडिट कार्ड व बँक खात्याबाबतची गोपनीय माहिती देऊ नका.
 • सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी कुटुंबातील सदस्याची मदत घ्या.
 • अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना कुटुंबातील सदस्यना कल्पना द्या.
 • अनोळखी व्यक्तीबाबत संशय आल्यास तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क करा.
 • अनोळखी व्यक्तीचे फोन, मेसेज, ईमेल किंवा लिंकला प्रतिसाद देऊ नका.
 • अनोळखी व्यक्तीला आपल्या डेबीट, क्रेडिट कार्ड व बँक खात्याबाबतची गोपनीय माहिती देऊ नका.
 • सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी कुटुंबातील सदस्याची मदत घ्या.
 • अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना कुटुंबातील सदस्यना कल्पना द्या.
 • अनोळखी व्यक्तीबाबत संशय आल्यास तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क करा.

  Video : मान-प्रसिद्धी देऊ शकत नाही दोनवेळची भाकर; कलाकारांवर आली बोंबिल-सुकट विकण्याची वेळ!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber Crime in Pune Fraud with three women