Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
Cyber Crime in Maharashtra: सायबर चोरट्यांनी फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात आयपीओमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना लिंक पाठवून शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती दिली. चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यास पैसे जमा करण्यास सांगितले.
पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोघांची ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पर्वती आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.