पुण्यात सायबर गुन्ह्यांच्या तपासात येणार सुसूत्रता; पोलिस ठाण्याची पुनर्रचना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांचे सुमारे 15 हजार अर्ज सायबर पोलिस ठाण्यात आले होते. वाढत्या गुन्ह्यांचा विचार करता सायबर पोलिस ठाणे समक्ष करण्याची आवश्‍यकता होती.

पुणे- शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना थांबविण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या प्रकारानुसार सायबर पोलिस ठाण्याची पाच युनिट तयार करण्यात आली त्यानुसार गुन्ह्याचा तपास दिला जाणार आहे. त्यामुळे सायबर गुन्हे उघडकीस आणण्यास अधिक मदत होणार आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही पुनर्रचना केली आहे. 

गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांचे सुमारे 15 हजार अर्ज सायबर पोलिस ठाण्यात आले होते. प्रत्येक वर्षी सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. वाढत्या गुन्ह्यांचा विचार करता सायबर पोलिस ठाणे समक्ष करण्याची आवश्‍यकता होती. त्यासाठी या ठिकाणचे मनुष्यबळ वाढविण्याबरोबर कामात सुसूत्रता आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सायबर गुन्ह्याच्या प्रकारानुसार आता पाच युनिट तयार करण्यात आली आहेत. गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार त्या त्या युनिटकडे संबंधित गुन्हे तपासासाठी दिले जाणार आहेत. पूर्वी एकाच तपास अधिकाऱ्याकडे विविध प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जात होते. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यास काही मर्यादा येत होत्या. मात्र या बदलामुळे आता तपास अधिकाऱ्यांकडे एकाच प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जाणार आहेत. या पाच युनिटसह पोलिस ठाण्याचे कार्यालयीन कामकाज, सायबर पोर्टल, पोलिस ठाण्यांना तांत्रिक साहाय्य करणारे कर्मचारी देखील असणार आहेत. 

'मुलाला वाचवायचं असेल तर ५ लाख द्या'; खुनाची धमकी देत महिला डॉक्‍टरकडे मागितली खंडणी

अशी होणार कार्यवाही 
सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तक्रारीच्या स्वरूपानुसार त्या-त्या युनिटला ती पाठविणार. युनिटचे पोलिस निरीक्षक सायबर तक्रारी अर्ज पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्याकडील अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देऊन गुन्हा दाखल करण्यास सूचना देतील. तक्रार अर्ज पोलिस ठाण्यांकडे पाठविण्याबाबत व तक्रार चौकशीनंतर अर्ज दप्तरी दाखल करण्याबाबत पर्यवेक्षण करतील. अर्जदाराच्या फसवणुकीची रक्कम 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास व तक्रारदार यांची संख्या जास्त असेल तर उपायुक्तांकडून तपासाबाबत सूचना दिल्या जातील. 

पुण्यातील इंजिनिअरिंगच्या तरुणीला फास्ट बाईक चालवणं पडलं महागात!​

अशी असणार पाच युनिट 
1) हॅकिग व डाटा चोरी : डाटा इनस्क्रिप्ट, मेल हॅकिंग, डाटा चोरी, डिजिटल सीगनेजर, 
2) ऑनलाइन बिझनेस फ्रॉड : ओएलएक्‍स, फ्लिपकार्ड, मल्टी लेव्हल मार्केटिंग, हॅकिंग मोबाईल मनी टॉन्स्फर, ऑनलाइन सेल ऍण्ड परचेस 
3) चिटिंग फ्रॉड : ऑनलाइन डेटिग साइट, इन्शुरन्स, जॉब, लोन, पॅकेज टूर, मोबाईल टॉवर, मेट्रिमोनियल 
4) सोशल नेटवर्किंग : फेसबुक, फेक डॉक्‍युमेंट, फेसबुक हॅकिग एक्‍सट्रोशन, डिफमेशन, अपलोड व्हिडिओ इत्यादी. 
5) एटीएम कार्ड फ्रॉड : मनी ट्रान्स्फर डेबिट, क्रेडिट कार्ड, क्‍लोन कार्ड, ओटीपी शेअर, मोबाईल, लॅपटॉप चोरी इतर 

IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cyber police station has been restructured