esakal | डी. एल. एड. प्रथम वर्षाच्या प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

edu.jpg

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

डी. एल. एड. प्रथम वर्षाच्या प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ; वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

प्रवेश  प्रक्रियेची माहिती आणि सविस्तर नियमावली राज्य परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
डी. एल. एड. प्रवेशासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) शाखेतील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून ४९.५ टक्के, तर आरक्षित प्रवर्गासाठी ४४.५ टक्के गुणांची अट आहे.

व्यवस्थापन कोटयातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज भरण्यासाठी ३१ ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

त्याशिवाय पडताळणीसाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी 'www.maa.ac.in' संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top