दापोडी ते निगडी दरम्यानचे सेफ्टी ऑडिट विकासकामांमुळे रखडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

आयआयटीकडून सेफ्टी ऑडिट 
महापालिकेने पवईच्या आयआयटीकडून निगडी ते दापोडीदरम्यानच्या रस्त्याचे सेफ्टी ऑडिट केले होते. मात्र, मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून त्यात खंड पडल्याने हा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोने या रस्त्याचे सेफ्टी ऑडिट करून आयआयटीने दिलेल्या सुचनांची पूर्तता करण्याची मागणी महापालिकेने केली आहे.

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडीदरम्यानच्या सुरू असणाऱ्या विकासकामांमुळे या रस्‍त्‍याच्‍या ‘सेफ्टी ऑडिट’ला अडथळा निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दापोडी ते पिंपरीदरम्यानच्या मेट्रोचे काम; तर निगडीतील भक्‍ती-शक्‍ती चौकात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून येथील सेफ्टी ऑडिट होऊ शकलेले नाही. मेट्रोच्या कामांमुळे दापोडी ते चिंचवडदरम्यानच्या रस्त्यावर वाहतूकव्यवस्थेत बदल केला आहे. सेफ्टी ऑडिट करताना वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित असणे आवश्‍यक असते. मात्र, तशी परिस्थिती सध्या नाही. निगडी ते दापोडीदरम्यानची बीआरटी सेवाही सलग नाही. मेट्रोमुळे अनेक ठिकाणी तिचा मार्ग विसंगत झाला आहे.

Video : सिलेंडरच्या स्फोटामुळे पिंपरीतील कंपनीला भीषण आग! 

फुगेवाडीतील सीएनजी पंपावर उलट्या दिशेने वाहने येतात. त्यामुळे तेथील चौक धोकादायक बनला आहे. जलद प्रवासासाठी वाहनचालकांकडून सेवारस्त्याचा वापर केला जातो. तो रस्ताही खराब झालेला आहे. कासारवाडी परिसरात रिक्षाचालकांची गर्दी, बसथांबा, मेट्रोची जड वाहने यामुळे येथे वाहतूक विस्कळित होते. ग्रेडसेपरटरमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत असल्याने सेवारस्त्याचा ताण वाढला आहे. भक्‍ती-शक्‍ती चौकातही उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने वाहने चालवणे धोकादायक झाले आहे. यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे.

Video : अरेरे...ही स्वच्छता म्हणायची, की नुसता ‘धुरळा’

मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या रस्त्याचे सेफ्टी ऑडिट करावे. सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्‍यक असणाऱ्या उपाययोजनांची पूर्तता करावी. त्यामुळे वाहतूक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. 
- विजय भोजने, प्रवक्‍ते, बीआरटी

प्रमुख समस्या...

  • पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फिनोलेक्‍स चौकातील सिग्नल कायम बंद असतात. त्यामुळे येथे सकाळ-सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होते. 
  • दापोडी ते निगडीदरम्यानच्या सेवारस्त्यावर थांबणाऱ्या रिक्षा आणि अन्य वाहनांमुळे होणारी कोंडी.
  • कासारवाडी चौकामध्ये थांबणाऱ्या प्रवासी बसेस.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dapodi to nigdi safety audit pending by development work