Video : अरेरे...ही स्वच्छता म्हणायची, की नुसता ‘धुरळा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

‘अहो, कदाचित तुम्हाला हे वादळ वाटत असेल; पण ही आहे पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’तील रस्त्यावरील धूळ. रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी महापालिका अत्याधुनिक रोड स्विपर मशिन वापरते. यावर वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु या मशिनमुळे रस्ते चकाचक होण्यापेक्षा ‘धुरळा’ जास्त उडतो आहे. त्यामुळे श्‍वसनाचे विकार जडत असल्याची नागरिकांची ओरड आहे.

पिंपरी - ‘अहो, कदाचित तुम्हाला हे वादळ वाटत असेल; पण ही आहे पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’तील रस्त्यावरील धूळ. रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी महापालिका अत्याधुनिक रोड स्विपर मशिन वापरते. यावर वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु या मशिनमुळे रस्ते चकाचक होण्यापेक्षा ‘धुरळा’ जास्त उडतो आहे. त्यामुळे श्‍वसनाचे विकार जडत असल्याची नागरिकांची ओरड आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांपाठोपाठ आता त्यातील उडणाऱ्या धुळीमुळे सध्या नागरिक त्रस्त आहेत. खड्डे खडीने भरले जात असल्याने ती इतरत्र पसरते. परिणामी, त्रासात अधिकच भर पडते. त्यामुळे खड्ड्यांवर खडीकरणाचा उतारा निरुपयोगी ठरला आहे. खडीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. डांबरी असो वा सिमेंट क्राँक्रीट रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याने रस्त्यांची ‘एैशी की तैशी’ झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तीन महिन्यांची मुदतवाढ 
स्वच्छतेच्याबाबत सर्वंच स्तरांतून टीका झेलावी लागणाऱ्या महापालिकेच्या ताफ्यात नऊ स्विपर मशिन होत्या; परंतु मुदत संपल्याने जूनपासून ठेकेदाराचे काम थांबविले होते. त्यामुळे सात महिने या मशिन रस्त्यावर दिसत नव्हत्या. तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने ठेकेदाराने आता पुन्हा एकदा या स्विपर मशिन रस्त्यावर उतरवल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार या मशिन त्या-त्या कार्यालयातील रस्त्यावर स्वच्छता करतात; परंतु या मशिनमुळे स्वच्छता कमी अन्‌ रस्त्यावर जास्त धूळच उडत असल्याची प्रकार समोर आला आहे.  

Video : सिलेंडरच्या स्फोटामुळे पिंपरीतील कंपनीला भीषण आग!

दरम्यान, शहरातील मुख्य रस्ते; तसेच काही चौकांमध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळी रोड स्विपर मशिनने रस्त्यांची सफाई करण्यात येते; परंतु या धुळीवर पाणी न टाकताच मशिन चालवित असल्याने मोठ्या प्रमाणात धुरळा उडतो. या धुळीचा त्रास स्थानिक नागरिकांबरोबरच वाहनचालकांना होतो. हे धूलीकण आरोग्यास हानिकारक असतानाही अशाप्रकारे बेजबाबदारपणे ही मशिन रस्त्यावर चालविणे म्हणजे कळस झाल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. 

पुणे : शेतकऱ्यांनी परतवला बिबट्याचा हल्ला 

रावेतमध्ये काम केले बंद
रावेत-भोंडवेवस्तीमार्गे मुकाई बीआरटी चौकात रविवारी दुपारी रस्ता स्विपर मशिनने स्वच्छता करण्यात येत होती; परंतु मोठ्या प्रमाणात धुरळा सर्वत्र उडाल्याने त्याचा त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनाही झाला. त्यामुळे सुरेंद्र पाटील या स्थानिक नागरिकाने हस्तक्षेप करीत मशिनचे काम बंद करण्यास सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more road dust in pimpri chinchwad