Video : सिलेंडरच्या स्फोटामुळे पिंपरीतील कंपनीला भीषण आग!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती महापालिकेचे उप अग्निशमन अधिकारी अशोक कानडे यांनी दिली.

पिंपरी : वल्लभनगर येथील इंडियन क्लोदिंग कंपनीला (आयसीसी) सोमवारी (ता.20) रात्री सव्वा आठच्या सुमारास अचानक आग लागली. रात्री उशिरपर्यत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथे असलेली ही कंपनी अनेक दिवसांपासून बंद आहे. सोमवारी या कंपनीत वेल्डिंगचे काम सुरु होते. काम झाल्यानंतर सर्व कामगार निघून गेले होते. दरम्यान, सव्वा आठच्या सुमारास कंपनीत स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला आगीचा भडका उडाला.

- ...म्हणून लोहगाव एअरपोर्टवरील सुरक्षेत दुप्पट वाढ!

याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या कंपनीत एकूण सहा प्लांट असून रात्री साडे दहापर्यंत तीन प्लांटमध्ये आग पसरली होती. अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 

- ...अन् जखमींच्या मदतीला धावले पोलिस आणि आरोपी!

दरम्यान, वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती महापालिकेचे उप अग्निशमन अधिकारी अशोक कानडे यांनी दिली.

- पुणे : 'डीएसके ड्रिमसिटी'साठी नवीन बिल्डर नेमा; न्यायालयात प्रस्ताव!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Company caught fire due to Cylinder explosion in Pimpri