'त्याने' अपंगत्वावर मात करत जिद्दीने घेतली व्यवसायात भरारी!

Datta_Chavan
Datta_Chavan

हडपसर (पुणे) : जन्मतः दोन्ही पायाने अपंगत्व. ज्याच्या घरी अठरा विश्‍वे दारिद्य्र, तरीपण खचून न जाता आणि कोणा पुढे हात न पसरता त्याने अपंगत्वावर मात करून जिद्दीने सायकल दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला.

आज तो स्वयंरोजगारातून आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा आहे. तसेच थकलेल्या आई-वडिलांचा सांभाळ करत आहे. अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगणार्‍या या जिद्दी दिव्यांग तरुणाचे नाव आहे दत्ता भगवान चव्हाण. त्याची जिद्द आणि जीवनप्रवास धडधाकड माणसांनादेखील प्रेरणादायी आहे.

घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे दत्ताला सातवीतूनच शिक्षण सोडावे लागले. दिव्यांगत्व असल्यामुळे कोणी नोकरी देत नव्हते. अखेर त्याने सायकल दुरूस्तीच्या एका दुकानात वर्षभर काम केले. त्यानंतर महालक्ष्मी मंदिराजवळ एक टपरी टाकुन सायकल दुरूस्तीचा व्यवसाय गेल्या पंधरा वर्षापूर्वी सुरू केला. दुकानातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने नुकतेच त्याने दुचाकी पंक्चर काढण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आता तो दुचाकीची पंक्चर काढत आहे.

जन्मापासून त्याची जीवनाची लढाई सुरू आहे. मात्र कितीही संकट आले तरी तो न डगमगता संकटांचा सामना करतो. खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागतो. तसेच आपल्या इतर दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांची माहिती देतो. दत्ता 'सकाळ'शी बोलताना म्हणाला, अपंगत्व ही मानसिकता आहे. त्याला चिकटून न राहता, उंच भरारी घेण्याची महत्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी आपार काबाडकष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. याच सकारात्मक विचारातून मी सातत्याने प्रयत्नवादी असतो.

मी करत असलेल्या व्यवसायामधून मिळणा-या उत्पनातून मी माझ्या आई-वडिलांचा सांभाळ करत आहे. त्यांचे आर्शिवाद माझ्यासाठी मोठे आहेत. सध्या मी भाडयाच्या खोलीत राहतो आहे. माझे स्वतःचे घर असावे ही माझी अपेक्षा आहे. यासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असे 'सकाळ'च्या माध्यमातून माझे अवाहन आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com