चिंचवड - संभाजीनगर येथील श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे आयोजित दत्त जयंती कार्यक्रमात पुष्पवृष्टी करण्यात आली.
चिंचवड - संभाजीनगर येथील श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे आयोजित दत्त जयंती कार्यक्रमात पुष्पवृष्टी करण्यात आली.

दिगंबरा...दिगंबरा...श्रीपाद वल्लभ दिगंबरा

पिंपरी - 'दिगंबरा...दिगंबरा...श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’ असा जयघोष, भजन, काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम जप, गुरुचरित्र पारायण, काल्याचे कीर्तन अशा उत्साही वातावरणात शहरात दत्त जयंती साजरी झाली. सायंकाळी दत्तजन्माचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्त मंदिरांमध्ये गर्दी केली होती. पादुकांची मिरवणूकही भक्तिमय वातावरणात पार पडली.

पिंपळे गुरव, संभाजीनगर, श्रीधरनगर, दळवीनगर, सांगवी, भोसरी, कासारवाडी, वाकड, प्राधिकरण, निगडी, हिंजवडी आदी ठिकाणी दत्त मंदिरांत आरास, रोषणाई करून लक्षवेधी फुलांच्या माळांनी मंदिरे सजविण्यात आली होती. दिवसभर मंदिरात नामस्मरण, रुद्राभिषेक, पारायण सुरू होते. कासारवाडीतील नवनाथ मित्र मंडळ दत्त प्रतिष्ठान, संभाजीनगरमधील श्री गुरुदत्त सेवा मंडळ, पिंपळे गुरव रोड येथील श्री दत्त साई सेवा कुंज, सांगवीतील दत्त आश्रम येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. 

वाल्हेकरवाडी, सायली कॉम्प्लेक्‍स येथे आयोजित चंद्रकांत महाराज खळेकर यांनी दत्त जयंतीची महती सांगितली. आमदार लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर सचिन चिंचवडे, चंद्रहास वाल्हेकर, नगरसेविका संगीता भोंडवे, मोरेश्‍वर भोंडवे, करुणा चिंचवडे, नामदेव ढाके उपस्थित होते. 

जुनी सांगवीत बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित दत्त आश्रमात दत्तनाम सप्ताह व संगीत महोत्सव झाला. सकाळी पादुकांचा अभिषेक झाला. सफरचंदांची सजावट लक्षवेधी होती. जयंत नगरकर व सहकाऱ्यांचे चौघडा वादन तर महादेव तुपे व सहकाऱ्यांचे शहनाई वादन झाले. माधव महाराज इंगोले यांनी कीर्तन सेवा केली. दत्तप्रतिमेवर पुष्पवृष्टी झाली. या वेळी महापौर उषा ढोरे, प्रशांत शितोळे उपस्थित होते. शकुंतला ढोरे प्रतिष्ठान व राधानंद संगीत विद्यालयाच्या वतीने महाआरती झाली. शास्त्रीय गायक पं. सुधाकर चव्हाण यांची संतवाणी झाली. नंदकिशोर ढोरे, बजरंग ढोरे यांनी सोहळ्याचे आयोजन केले.

भोसरी येथील डायनोमर्क कंपनीत दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कंपनीच्या संचालिका अमिता राऊत व व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांच्या हस्ते दत्ताची पूजा, होमहवन व अभिषेक झाला. दिवसभर भक्तिगीते सादर झाली. दत्त जयंतीनिमित्त कामगारांना व कुटुंबीयांना स्नेहभोजन देण्यात आले. किशोर राऊत, सूर्यकांत मुळे, गुणवंत कामगार श्रीकांत जोगदंड, विभाग प्रमुख प्रवीण बाराथे, मोहन कृष्णन, हर्शल शेळके, आमोद राऊत यांनी कार्यक्रम पार पाडला. जयश्री बोरसे व सहकारी महिलांनी दत्त मंदिरासमोर आकर्षक रांगोळी काढली. रवी भेनकी, शिंदे बाळासाहेब, एल्लापा पौगुडवाले, डॉ. मनीक स्वामी यांनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com