दौंड : एसटी आगारात संपावर असणार्या एसटी कर्मचार्यांना दिला दिवाळी फराळ

एसटी आगारातील १६३ कर्मचारी ८ नोव्हेंबर पासून संपात सहभागी झाले आहेत.
दौंड : एसटी आगारात संपावर असणार्या एसटी कर्मचार्यांना दिला दिवाळी फराळ
दौंड : एसटी आगारात संपावर असणार्या एसटी कर्मचार्यांना दिला दिवाळी फराळ sakal

दौंड (पुणे) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी दौंड एसटी आगारातील १६३ कर्मचारी ८ नोव्हेंबर पासून संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे सलग तिसर्या दिवशी आगाराचे काम पूर्णपणे ठप्प असून प्रवाशांचे हाल झाले आहेत.

दौंड एसटी आगारात संपावर असणार्या एसटी कर्मचार्यांना कोरडा पाठिंबा न देता भाजपच्या पदाधिकार्यांनी त्यांना दिवाळीचा फराळ, मिठाई आणि पोशाख देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. भाजप पुणे जिल्हा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष स्वप्नील शहा यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आगाराच्या प्रांगणात जाऊन एसटी कर्मचार्यांना दिवाळीचा फराळ, मिठाई, शर्ट व पॅण्ट पीसच्या रूपात पोशाख दिला.

दौंड : एसटी आगारात संपावर असणार्या एसटी कर्मचार्यांना दिला दिवाळी फराळ
Pakistan: हल्ले सुरूच! पेशावरमध्ये शीख डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

विविध अडचणींमधून जाणार्या एसटी कर्मचार्यांना सहानुभूती देताना त्यांना पण दिवाळी आहे, याची जाणीव ठेवून छोटीशी भेट दिली आहे. महाविकास आघाडीने एसटी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा स्वप्नील शहा यांनी या वेळी व्यक्त केली.

एसटी कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारचे औषधे लागल्यास ते उपलब्ध करून देण्याची ग्वाही औषध वितरक राहुल भंडारी यांनी दिली. रवींद्र बंड, स्वप्नील ठाणगे ,विशाल महामुनी, ओंकार तारू, सचिन महामुनी, आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com