Daund : ... त्याचे ते शेवटचे आईस्क्रिम ठरले असते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

... त्याचे ते शेवटचे आईस्क्रिम ठरले असते

... त्याचे ते शेवटचे आईस्क्रिम ठरले असते

दौंड : आईस्क्रिम घेण्यासाठी दौंड रेल्वे स्थानकावर उतरलेला एका अकरा वर्षीय मुलगा चालती एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्नात फलाटाखाली पडला. परंतु लोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्याला जीवदान मिळाले आहे.

हेही वाचा: चित्रा वाघ यांचा पत्ता कट, विधानपरिषदेसाठी बावनकुळेंना संधी!

दौंड रेल्वे स्थानकावर १९ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेअकरा वाजता हा प्रकार घडला. शाहीन जस्वीन (वय ११, रा. तामिळनाडू) हा मुलगा कोईमतूर - कुर्ला एक्सप्रेसने आईबरोबर एस - ९ या आरक्षित डब्ब्यातून प्रवास करीत होता. दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवर एक्सप्रेस आल्यावर शाहीन आईस्क्रिम घेण्यासाठी खाली उतरला. आईस्क्रिम खाण्याच्या नादात त्याला गाडी सुटल्याचे लक्षात आले नाही व जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने घाबरत चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्याचा पाय जिन्यावरून घसरल्याने तो फलाट आणि लोहमार्ग यामधील जागेत खाली पडला.

हेही वाचा: रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने जिंकली पहिली मालिका

त्याच दरम्यान रेल्वे स्थानकावरील पोलिस नाईक अरूण आत्माराम टिंगरे यांनी हा प्रकार पाहून क्षणाचाही विलंब न करता तत्काळ गाडीत जाऊन आपत्कालीन साखळी ओढून गाडी थांबविली. त्यानंतर त्याला उचलून बाहेर काढले. सुदैवाने या सर्व प्रकरणात शाहीन यास कोणतीही जखम झाली नाही. मुलाला एकट्याने फलाटावर उतरण्याची मुभा देणारी निष्काळजी आई काही मिनिटांमध्ये झालेल्या प्रकारामुळे पूर्णपणे स्तब्ध झाली होती. मुलाला जीवदान मिळाल्याने अरूण टिंगरे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी या आईचे शब्द अपुरे पडले. अरूण टिंगरे यांच्या या प्रसंगावधानाचे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे व पोलिस ठाण्यातील सहकार्यांनी कौतुक केले आहे.

loading image
go to top