esakal | दौंड : सफाई कर्मचारी झाले चालक, नगरपालिकेच्या वाहनाला अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

नगरपालिकेच्या वाहनाला अपघात

दौंड : सफाई कर्मचारी झाले चालक, नगरपालिकेच्या वाहनाला अपघात

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड नगरपालिकेचे सफाई कर्मचारी चालवत असलेल्या नगरपालिकेच्या कारकडून नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्या पतीच्या खासगी वाहनाला पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. अपघातात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. अपघात घडला तेव्हा नगराध्यक्षा नगरपालिकेच्या कार मध्ये तर त्यांचे पती खासगी कार मध्ये होते.

हेही वाचा: पुण्यासाठी दीडशे टन ऑक्सिजनसाठा ठेवा

दौंड नगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीसंदर्भात मुंबई येथे उच्च न्यायालयात ७ सप्टेंबर रोजी असणार्या सुनावणीस हजर राहण्यासाठी नगराध्यक्षा शीतल कटारिया, नगरसेविका पूजा गायकवाड या नगरपालिकेच्या कारमधून ६ सप्टेंबर रोजी दौंड येथून मुंबई कडे निघाल्या होत्या. सफाई कर्मचारी वरिष्ठांच्या तोंडी आदेशाने नगरपालिकेची कार चालवीत होते. तर नगराध्यक्षा शीतल कटारिया यांचे पती तथा माजी प्रभारी नगराध्यक्ष योगेश कटारिया हे त्यांच्या सहकार्यांसमवेत त्यांच्या खासगी कार मधून त्याचवेळी मुंबई कडे निघाले होते.

हेही वाचा: विविध रुपातल्या गणेशमूर्तींना विरोध; पाहा व्हिडिओ

६ सप्टेंबरला रात्री द्रुतगती महामार्गावर योगेश कटारिया यांच्या कारचा अचानक ब्रेक दाबला गेल्याने ती कार थांबली व पाठीमागे असलेल्या नगरपालिकेच्या कारने त्या कारला जोरदार धडक दिली. अपघातात नगरपालिकेचे चालक असलेले सफाई कामगार यांना मुका मार लागला. तर शीतल कटारिया व पूजा गायकवाड यांच्या पायांना किरकोळ मार लागला. धडकेत योगेश कटारिया यांच्या कारचा पार्श्वभाग आणि नगरपालिकेच्या कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने क्रेन लावून न्यावी लागली.

नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना युतीचे गटनेते बादशहा शेख यांनी या अपघात बाबत मुख्याधिकारी यांच्याकडे चौकशीची व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली आहे.

हेही वाचा: पोलिस जनता दरबारात बारामतीत एकाच दिवशी १२८ अर्जांवर निर्णय

सफाई कर्मचारी झाले चालक....

नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या वापरासाठी असणार्या कारसाठी चालकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. चालकाचे पद रिक्त असताना सफाई कर्मचारी यांना चालक म्हणून मुंबई येथे नेण्यात आले व तेव्हा हा अपघात झाला. सदर कर्मचारी यांना तात्पुरते चालक म्हणून नियुक्तीचा आदेश दिला नसल्याची माहिती उप मुख्याधिकारी सुप्रिया गुरव यांनी दिली.

खासगी नाही नगरपालिकेचे काम....

उच्च न्यायालयात नगराध्यक्षा यांना प्रतिवादी केल्याने त्या कामासाठी शासकीय वाहन मुख्याधिकारी, उप मुख्याधिकारी व वाहन विभागप्रमुख यांना सांगून मुंबई येथे नेले होते. दुसर्या दिवशी तारीख असल्याने आणि अपघातानंतरची परिस्थिती भीषण असल्याने पोलिसांना कळविण्याचे राहून गेले, अशी माहिती नगराध्यक्षा शीतल कटारिया यांना दिली.

loading image
go to top