Leopard Attack:'पिंपळवंडी येथे बिबट्याचा दिवसा थरार'; घराच्या दरवाजाला दिल्या धडका; घरासमोर बांधलेल्या मेंढीला केले ठार
Wildlife Alert: ऋषीकेश वाघ(वय १४) या लहान मुलाने सांगितले की मी घराच्या बाजूला असताना माझ्या समोरच बिबट्याने मेंढीला मारले.बिबट्याला पाहताच मी घरामध्ये गेलो.माझ्या सोबत ओम व विश्वजित हे माझे लहान भाऊ देखील सोबत होते.
पिंपळवंडी : येथील काकडपट्टा(ता.२) शिवारात राहणारे शेतकरी मयुर नेताजी वाघ यांच्या घरासमोर बांधलेल्या मेंढीला बिबट्याने गुरुवारी( ता.२) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हल्ला करून ठार केले.