esakal | एका रुग्णाचा मृतदेह सोपविला दुसऱ्या नातेवाईकांना, पुण्यातील खळबळजनक प्रकार

बोलून बातमी शोधा

The dead body of one corona patient handed over to another relative in Aundh Government Hospital

मिळालेल्या माहितीनुसार, रखमाबाई जाधव या महिलेची तब्येत अचानक खराब झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना औंध येथीली जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान, कोरोनामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवागारात पाठवला. दुसऱ्या दिवशी रखमाबाई यांचा मुलगा दिपक जाधव आणि सून माया जाधव रुग्णालयात पोहचले. त्यांना सोपविलेला मृतदेह पाहून दोघेही आवाक् झाले.

एका रुग्णाचा मृतदेह सोपविला दुसऱ्या नातेवाईकांना, पुण्यातील खळबळजनक प्रकार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्याजवळील औंध जिल्हा सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे 90 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला, पण त्या महिलेचा मृतदेह दुसऱ्यांनाच सोपविल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णायलय प्रशासनाने सुरवातीस नातेवाईकांना त्यांच्याच रुग्णाचा मृतदेह सोपविल्याचा दावा केला. परंतु, प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपासणी केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रखमाबाई जाधव या महिलेची तब्येत अचानक खराब झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना औंध येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान कोरोनामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवागारात पाठवला. दुसऱ्या दिवशी रखमाबाई यांचा मुलगा दिपक जाधव आणि सून माया जाधव रुग्णालयात पोहचले. त्यांना सोपविलेला मृतदेह पाहून दोघांनाही धक्काच बसला कारण तो मृतदेह दुसऱ्याच महिलेचा होता.

याबाबत, रुग्णलायाच्या कर्मचाऱ्यांकडून विचारले असता, ''रात्री रुग्णालयात दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला होता आणि दोन्ही मृतदेह शवागारात ठेवण्यात आले होते. एक मृतदेहाची ओळख पटवून नातेवाईक घेऊन गेले. रुग्णालय प्रशासनाने दुसरा मृतदेह रखमाबाई यांचा असल्याचा दावा केला. नातेवाईकांनी तो ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करावे असेही त्यांनी सांगितले. 

हे वाचा - पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत!


डिएनए टेस्टची तयारी
रुग्णालय प्रशासनाचे उत्तर ऐकूण हैराण झालेले नातेवाईक म्हणाले की, ''ज्या आईने लहापणापासून सांभाळले, बोट पकडून चालायला शिकवले, जिच्या डोळ्यांसमोर लहानाचे मोठे झाले तिला ओळखण्यात आम्ही चूक कशी करु'' माध्यमांनी या प्रकाराची दखल घेत रुग्णालय प्रशासानासोबत संपर्क साधला. ''इतक्या गंभीर चुकीकडे दुर्लक्ष्य कसे काय केले जाते'' असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली आणि चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच या प्रकराणात कोणी दोषी आढळ्यास कडक कारवाई केली जाईल'' असे आश्वसन दिले. अखेर सत्य  काय आहे जाणून घेण्यासाठी बोटाचे ठस्से आणि डिएनए टेस्टची तयारी सुरू आहे. या टेस्टेचे रिपोर्ट आल्यानंतरच समजेल की, 3 दिवस शवागारात ठेवलेला मृतदेह रखमाबाई यांचा आहे की नाही?

पुणेकरांनो, किती हा निष्काळजीपणा? मार्केटयार्डात नागरिकांची झुंबड

दरम्यान, नातेवाईकांनी अशी भिती वाटत आहे की, रखमाबाईंचा मृतदेह घेऊन गेलेल्या नातेवाईकांनी जर त्यावर अंत्यसंस्कार केले तर आपल्या आईचे तोंड देखील पाहायला मिळणार नाही. असे घडल्यास त्याची भरपाई रुग्णालय प्रशासन कसे करणार? असा आर्त प्रश्नही त्यांनी यावेळी मांडला. जे लोक रखमाबाईचा मृतदेह घेऊन गेले त्यांच्याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचेही, त्यांनी यावेळी सांगितले.