Deccan police files case against WhatsApp group admin
Deccan police files case against WhatsApp group admin

कपडे विक्रीच्या नावाखाली केली 50 हजारांची फसवणूक 

पुणे : तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीने निर्माण केलेल्या व्हॉटस्‌अप गृपला जोडलेले आहात, त्या गृपवर एक दिवशी गृप ऍडमीनने कपड्यांचे मार्केटिंग करून नवीन कपडे कमी किमतीत देत असल्याची जाहिरात केली. त्यास एका व्यक्तीने प्रतिसाद दिला. त्यानुसार त्यांच्यात 70 हजार रुपयांचा व्यवहार करण्याचे ठरले, पण त्याने ऑनलाइन 50 हजार रुपयांची आगाऊ रक्कम घेतली. त्यानंतर तो व्हॉटस्‌अप गृप आणि तो मोबाईलही कायमचा बंद झाला. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी प्रफुल्ल दिवटे (वय 32, रा. हडपसर) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिवटे यांच्या मोबाईलमधील व्हॉटसअ्‌पवर एका अनोळखी व्यक्तीने व्हॉटस्‌अप गृप तयार केला. त्यामध्ये दिवटे यांच्या मोबाईल क्रमांकाचा समावेश केला. संबंधित व्हॉटस्‌अप गृपचा ऍडमीन हा गृपवर विक्रीसाठी कमी किमतीमध्ये कपडे उपलब्ध करून देण्याची जाहिरात करत होता. फिर्यादी यांनी त्यास प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांच्या व्हॉटस्‌अप व फोनवर संभाषण सुरू झाले. फिर्यादी विक्री करण्यासाठी त्याच्याशी 70 हजार रुपयांची कपडे घेण्याचे कबूल केले. त्याचवेळी संबंधित गृप ऍडमीनने फिर्यादी दिवटे यांना आगाऊ रक्कम म्हणून 50 हजार रुपयांची मागणी केली. दिवटे यांनीही कुठलीही खातरजमा न करता, त्याने दिलेल्या बॅंक खात्यावर 50 हजार रुपये तत्काळ पाठवून दिले. 

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

दिवटे यांनी काही दिवस वाट पाहिली, परंतु विक्रीसाठीचे कपडे येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संबंधित व्हॉटसअप व फोनवर संपर्क साधला. मात्र त्यांना त्या व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com